


आज सोमवार दिनांक ३०/०७/२०२३, रोजी कुरूळी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर दोन येथे दुपारी १ ते ५ या कालावधीत संपन्न झाली. केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री. हिरामण कुसाळकर सर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरित्या पार पडली.
प्रथम केंद्रप्रमुख व सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांनी सरस्वती पूजन केले. सुंदर असे ईशस्तवन आणि स्वागतगीत जि. प. प्राथमिक शाळा चाकण नंबर एकच्या बालचमुनी आपल्या मधुर गायनाने आणि संगीत साथीने साकारले.
*आभार प्रदर्शन*
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि भारदस्त सूत्रसंचालन श्री. देवराम मुंढे सर व श्री. संतोष दौंडकर सर यांनी केले. फलक लेखन अक्षरमित्र श्री. काळुराम डावरे सर यांनी केले. कलात्मक रांगोळी चाकण नंबर एकच्या महिला भगिनींनी प्रवेशद्वारापाशी साकारली. शेवटी चाकण नंबर एक शाळेच्या ज्येष्ठ पदवीधर शिक्षिका अलका कड/ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले व शिक्षण परिषदेची सांगता झाली.
श्री. तुकाराम वाटेकर, (पदवीधर शिक्षक, जि.प. प्रा. शाळा राणूबाईमळा- चाकण)