


सानिका कोकाटे राहणार आळेफाटा वय 20 ही आपल्या वडिलांसमवेत दुचाकी वर आंबेठाण बाजू कडून चाकण गावामध्ये येत असताना सदर अपघात झाला चाकण मधील अपघातांची मालिका संपता संपेल सलग तिसऱ्या दिवशी दुचाकी चालकाला कंटेनर खाली येऊन मृत्यू आला आंबेठाण रोडवरील माता मंदिराजवळ प्राथमिक शाळेच्या समोर हा अपघात घडला कंटेनर चालक अपघात स्थळापासून वाहन पुढे चालवत रस्त्यावरच सोडून पळून गेला संतप्त जमावाने वाहन चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालक आंबेठाण चौकापर्यंत जाऊन फरार झाला चाकण मधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालले असून दुचाकी चालकांना तसेच पायी चालणाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून जावे लागत आहे आंबेठाण चौक येथे आतापर्यंत अनेक अपघात होऊन कित्येक जण मृत्युमुखी पडले आहेत मायबाप सरकार खासदार आमदार मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री चाकण मध्ये वारंवार कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असतात त्यांना चाकणकरांची समस्या सोडवता येईल का ? वाहतूक कोंडी आणि त्यावरच्या उपाययोजना यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत परंतु अपघातांची मालिका चाकणकरांसाठी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत लागोपाठ होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊन वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे