खेड पोलीस स्टेशन हदिदतील दि. १५/०८/२०२३ रोजी स्वातंत्र्य दिनी खेड पोलीस स्टेशन यांची धडक कारवाई माहितीबाबत

Spread the love

खेड पोलीस स्टेशन पुणे- नाशिक हायवेरोडवर दि.१५/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा चे दरम्यान स्वातंत्र्य दिनाचा अवचित्य साधुन रोड रोमीयावर व भरधाव वेगाने वाहन चालीणा-या बुलेट चालकावर, तसेच बुलेट गाडीचा फटाक्यासारख्या आवाज काढणारे रोड रोमीयो यांचेवर खेड पोलीस स्टेशन हदिदमध्ये आज दि. १५/०८/२०२३ रोजी धडक कारवाई करण्यात आलेली आहे.

सदर कारवाई मा. सुदर्शन पाटील साो, उपविभागीय पोलीस अधिकारी साो, खेड विभाग खेड, यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली मा. राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक, पोसई ज्ञानेश्वर राऊत, डीबी पथकाचे पो हवा संतोष मोरे, पो ना गेंगजे, पो अं योगेश भंडारी, पो अं सागर शिंगाडे, वाहतुक विभागचे स फौ लक्ष्मण न हे, स फौ बबन भवारी, पो कॉ संजय पावडे, व पो हवा विजय राहतेकर यांनी आजरोजी ५ बुलेट गाडी व १ एमाहा गाडी ताब्यात घेवुन सदर गाडी चालवीनारे अल्पवईन बालक यांना खेड पोलीस स्टेशन येथे आणुन संबधितांचे नातेवाईक यांना खेड पोलीस स्टेशन येथे बोलावुन त्यांचे समउपदेशन करण्यात आले व सदर ताब्यात घेण्यात आलेल्या गाडयांवर महाराष्ट्र पोलीस मोटार वाहन कायदा कलमान्वये साधरण ५०,०००/- हजार रुपये दंड करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही खेड पोलीस स्टेशसन हदिदतील सर्व महाविदयालयात व सर्व शाळा परिसरामध्ये अचानकपणे पुढे सतत अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत श्री. राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन यांनी प्रसार माध्यमांना दिलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents