


15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून चाकण मधील श्रीरामनगर परिसरात प्रथम नगराध्यक्ष सौ.पुजाताई कड-चांदेरे यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीरामनगर फेडरेशन चे अध्यक्ष श्री.साहेबराव कड यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण व CCTV कॅमेरा चे उदघाटन समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला
याप्रसंगी चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.सुनील बल्लाळ साहेब यांच्या हस्ते सीसीटीव्ही कार्यान्वित व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या वेळी श्रीरामनगर मधील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
या वेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.सुनील बल्लाळ साहेब यांचा सन्मान डॉ. भरत राउत यांच्या हस्ते करण्यात आला, श्रीरामनगर फेडरेशन चे उपाध्यक्ष श्री.माउली काका मुंगसे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सगळ्याचे आभार मानले
मुख्याधिकारी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सोसायटी मधील सर्व सभासदांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या श्रीरामनगर सोसायटीमध्ये वृक्षारोपण व इतर सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत आहेत प्रभाग क्रमांक 22 मध्ये प्रलंबित कामाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रलंबित कामे मार्गी लावू तसेच सोसायटीतील सदनिका धारक यांचे फ्लॅट हस्तांतरण बाबत स्वतंत्र कॅम्प द्वारे नागरिकांना सुविधा देण्याची कार्यवाही नगरपालिका कडून करण्यात येईल
अश्या प्रकारे सर्व कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला
या वेळी सौ.पूजाताई कड- चांदेरे यांच्या सोबत सौ.सिंधुताई शिदोरे,सौ.मिराताई कड,सौ.अनिताताई कड,सौ.मनीषाताई मुंगसे,सौ.शिल्पताई देशपांडे,सौ.सुमनताई चव्हाण,सौ.सरोजताई कुलकर्णी,सौ.वर्षाताई पटाईत याच प्रमाणे मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते