
प्रतिनिधी :- सुदर्शन मंडले
ओतुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. सचिन कांडगे यांच्या आदेशाने पो. हवा.नरेंद्र गोराणे ब. नं.2065, पो. ना देविदास खडेकर ब. नं.2592, पो. कॉ. मनोज कुमार राठोड ब. नं.1117व पोलीस मित्र रवी मातेले असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, मोजे ओतूर ता. जुन्नर जि. पुणे गावाच्या हद्दीत अहमदनगर कल्याण हायवे मोनिका चोक ठिकाणी आरोपी नामे शाकीर कमृद्दिन शेख वय -49 वर्ष राहणार संगमनेर खु|| चर्चेच्या समोर ता. संगमनेर जि.अहमदनगर हा त्याचा ताब्यातील पिकअप गाडी एम एच 14 के ए 9252 ही घेऊन अहमदनगरबाजूकडून कल्याण बाजू कडे जात होती. गाडीत 3,000किलो वजनाचे गोमंश मिळून आले आले आहे. सादर आरोपीच्या ताब्यातून 600000/-रु किंमतीचे अंदाजे 3000किलो वजनाचे गोमंश 2)300000/-पिकअप जप्त करण्यात आले आहे. याच्यावर कलम 425/2023 गोवंश हत्या महाराष्ट्र पशु संरक्षण सुधारणा अधिनियम 1976 चे कलम 5(c)9(a)9(b) माने ओतूर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला.