
सुदर्शन मंडले
(ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा )
आळेफाटा दि 22 :- खासदार अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली आळेफाटा येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले .केंद्र सरकारने आयात निर्यात धोरणात कांदा निर्यातीवर ४०%निर्यात शुल्क आकारणीच्या विरोधात तालुक्यातील शेतकरी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले . यावेळी शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निर्यात शुल्क आकारणीच्या घोषणेचा जाहीर निषेध केला .यावेळी नगर – कल्याण आणि पुणे – नाशिक हायवे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या .पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला .गेल्या तीन वर्षांपासून शेतमालास हमीभाव नसून यंदा अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असून हाताशी आलेला कांदा पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाहीये .सरकारच्या निर्यात शुल्क आकारणीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झालेली असून शेतकरी अक्षरशः आर्थिक अडचणीत सापडलेला आहे .शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव नाही , कांदा निर्यात शुल्क आकारणी निर्णय मागे घेण्यात यावा .ठिकठिकाणी आंदोलनाची तीव्रता बघता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ लाख मेट्रिक टन कांदा २हजार ४५० रू प्रति क्विंटल दराने खरेदी करणारं असल्याबाबत चे ट्विट केले आहॆ .मात्र शासनाने कांदा ४ हजार रू प्रति क्विंटल दराने खरेदी करावा अशी आग्रही मागणी शेतकरी संघटना यांच्या वतीने करण्यात आली .माऊली खंडागळे ,शरद चौधरी , मोहन मटाले , यांनी निर्यात शुल्क निर्णयाच्या विरोधात भावना व्यक्त केल्या .यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर , पांडुरंग पवार , मोहित ढमाले , अंकुश आमले , शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे ,शिवसेना नेते शरद अण्णा चौधरी ,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना माजी चेअरमन देवदत्त निकम , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे ,अशोक घोडके ,मोहन मटाले ,शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे , संजय भुजबळ ,गणेश भाऊ कवडे ,जीवन शेठ शिंदे ,आळे गाव उपसरपंच विजय कु-हाडे आदी सर्व पक्षीय नेते ,कांदा उत्पादक शेतकरी , ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते .