
चाकण येथे 76 व्या अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय ग्रेडींग परीक्षेचे आयोजन
वार्ताहर: चाकण: दि. 8 सप्टेंबर 2023:
आंतरराष्ट्रीय गणित महामंडळ, तैवान, (IAMA, Taiwan) आयोजित 76 वी अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय ग्रेडींग परीक्षा रविवार दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी चाकण येथील संतोष ऑल रॉऊंडर अँकॅडमी या मान्यताप्राप्त सेंटर येथे आयोजित केली आहे. या परीक्षेला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून 110 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. चाकण सेंटरमधून 79 विद्यार्थी अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय ग्रेडींग परीक्षेला बसले आहे.

चाकण येथील संतोष ऑल रॉऊंडर अँकॅडमीच्या सर्व सेंटरमधून आणि चाकण येथील सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 3 मिनिटांमध्ये गणिताची 30 कठीण उदाहरणे सोडवायची असतात. या 79 विद्यार्थ्यांचा परीक्षेचा सराव मुख्य सेंटर, संतोष ऑल रॉऊंडर अँकॅडमी येथे दि. 28 ऑगस्ट 2022 पासून विशिष्ट पद्धतीने रोज एक तास सुरू आहे. रोज सरावामध्ये विद्यार्थ्यांकडून संगीत ध्यान घेतले जाते. 3 मिनिटांचा वेळ लावून पेपर सोडविला जातो. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 200 पेक्षा जास्त पेपर सोडवून घेतले जातात. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना एनर्जी ड्रिंक पिण्यासाठी सांगितले जाते.

अबॅकसमुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, आकलन क्षमता, ग्रहण क्षमता आणि अभ्यासाचा वेग 40 ते 50 पटीने वाढतो. गणित सोपे होते. गणिताची भीती जाते, या कोर्समुळे
विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार होतात. अबॅकस कोर्स हा एकूण 9 लेव्हलचा 2 वर्षांचा आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट कोर्स आहे. सन 2012 पासून असे विविध 10 प्रकारचे कोर्सेस चाकण येथे संतोष ऑल रॉऊंडर अँकॅडमीच्या माध्यमातून शिकविले जातात. आजपर्यंत चाकण पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला आहे. या परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची निवड जून 2024 च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी होईल.

अशी माहिती
आंतरराष्ट्रीय गणित महामंडळाचे महाराष्ट्र विभागाचे प्रमुख अकॅडेमीचे डायरेक्टर
डॉ. प्रवीण आघाव आणि मुख्य प्रशिक्षक आणि परीक्षा विभागाच्या प्रमुख आदर्श प्राचार्या पुरस्कार विजेत्या प्रा. अर्चना आघाव यांनी दिली. पुणे जिल्हा परिषद सदस्य आणि मा. आमदार श्री शरद बुट्टेपाटील, सर्व पालक वर्ग, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था चालक आदीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संपर्क:-
प्रा प्रवीण आघाव
9604777827