
सुदर्शन रविंद्र मंडले
(जुन्नर तालुका प्रतिनिधी )
आळेफाटा येथे आज आळे, आळेफाटा, रामवाडी, खापरवडी,हमाल पंचायत संघटना, बबलु भंडलकर मित्र मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने आज आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक याची 232 शासकीय जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळेस आळे गावचे माजी जि.प .सदस्य प्रसन्ना अण्णा डोके , पं.स.सदस्य जीवन भाऊ शिदे , ग्रामपंचायत सदस्य बाजीरावशेठ लाड माजी चेअरमन रविंद्र गुजाळ, सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ गुजाळ,ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ सदस्य प्रदिपशेठ गुजाळ, सम्राटभाऊ कुऱ्हाडे, पत्रकार जयवंतशेठ शिरतर,नंदकिशोर विधाटे साहेब , प्रमोदशेठ पाडेकर, प्रविण महाले साहेब, निलेशभाऊ भुजबळ, निलेश डोंगरे, मंगेश पाडेकर, निलेश बांगर, विपुलभाऊ येलमर,गायत्रीचे संचालक वसंतराव शिरतर, अशोक नाना भंडलकर, नानासाहेब भंडलकर, किसन दादा येलमर, विलास वाघोले , गौरीताई भंडलकर , धोडीभाऊ भंडलकर, सोपानराव भंडलकर, रमेश भंडलकर, सर्व मित्र परिवार,तसेच आळेफाटा येथील राजकीय व सामाजिक कार्यकतँ मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळेस उपस्थित मान्यवराच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले तसेच त्याना मानवंदना देण्यात आली.तळीभंडार भरुन राजे उमाजी नाईक याच्या नावाने जयघोषा करत संपूर्ण परीसर दणाणून सोडला होता.यावेळेस भारत माता की जय तसेच वंदे मातरम या देखील देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.
उपस्थित मान्यवरांना पं.स.समितीचे सदस्य जीवन भाऊ शिदे, मा.जी. सदस्य प्रसन्नाअण्णा डोके आदींनी मार्गदर्शन केले