
मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी आय. टी. पार्क मध्ये काम करणारे तरुण/तरुणी कामाचे बोजामुळे व्यसनाकडे वळुन अंमली पदार्थाचे विळख्यामध्ये पडु नयेत करीता जनजागृती करणे व कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.
मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे स्वप्ना गोरे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे, सतीश माने, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, राजन महाडीक व पोलीस अमलदार यांची वेगवेगळी. पथके तयार करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केलें त्याप्रमाणे हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार प्रदिप शेलार व मितेश यादव यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मुंबई-बेंगलोर हायवे पै तानाजी बबनराव दगडेपाटील कामानीजवळ व पुतळ्याजवळ, बावधन पुणे येथे दोन इसम हे अवैध मेफेड्रॉन (एम.डी.) व अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ डुडा) हा अंमली पदार्थाची विक्री करीता येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठांचे परवानगीने बातमीचे ठिकाणी छापा कारवाई करीता चपोनि संतोष पाटील, सपोनि प्रशांत महाले, पोउपनि राजन महाडीक, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व अंमलदार यांची पथके तयार करून छापा कारवाईबाबत सुचना देवून बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी करुन दबा धरुन थाबलो असता पै तानाजी बबनरात दगडेपाटील कामानीसमोर मोकळ्या जागेमध्ये दोन इसम कोणाची तरी वाट पाहत थांबले. त्यांच्या हालचाली पाहून हेच ते इसम असल्याचा संशय आल्याने त्यांना सोबतचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) रविप्रकाश सुखराम बिष्णोई वय ३७ वर्षे रा. निलेश वेढे यांचे खोलीत विठ्ठल मंदीराजवळ बावधन खुर्द पुणे मुळगाव सदरी ता. लोहावट जि. फलोदी राज्य राजस्थान व २) सुरेशकुमार साईराम बिष्णोई वय ३० वर्षे रा. वडकीनाला बाळासाहेब पठारे यांचे खोलीत, हडपसर पुणे मुळगाव हेमंतनगर ता लोहावट जि. फलौदी राज्य राजस्थान असे असल्याचे सांगीतले. त्याची झडती घेतली असता अ.क्र.१ याचे ताब्यात १ किलो ७०५ ग्रॅम अफुचा चुराची (पॉपी स्ट्रॉ / डुडा) तर अक्र. २ याचे ताब्यात ६१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) मिळुन आले.
इसम नामे १) रविप्रकाश सुखराम बिष्णोई व २) सुरेशकुमार साईराम बिष्णोई यांचेकडुन एकुण ३,३९,५७५/- रु. किं.चा मुद्देमाल ज्यामध्ये ६१ मेफेड्रॉन (एम.डी.) १ किलो ७०५ अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/ डुडा), व ०२ मोबाईल जप्त करण्यात आले असुन यांनी त्यांचेकडे मिळुन आलेला मेफेड्रॉन (एम.डी.) व अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ / डुडा) हा अंमली पदार्थ त्यांचा राजस्थानमधील साथिदार नामे सोनु जालोरा याचेकडुन आणला असुन ते हिंजवडी मध्ये असणारा त्यांचा साथिदार जयप्रकाश बिष्णोई रा. हिंजवडी पुणे यास विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यास चौघाविरुध्द हिंजवडी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १५ (ब), २२ (क) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, मा वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उप निरीक्षक राजन महाडीक, ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, मितेश यादव, मयुर वाडकर, संतोष भालेराव, रणधीर माने, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, पांडुरंग फुंदे, नागेश माळी, मारुती जायभाये, तानाजी पानसरे यांचे पथकाने केली आहे.
( स्वप्ना गोरे)
पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड