
शिक्रापूर : सणसवाडी ता. शिरूर येथील वाईन शॉप मधील सव्वा दोन लाख रुपये घेऊन फरार झालेला आरोपी ला शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने लखनऊ मधुन जेरबंद केले असुन आरोपी चे नाव भानु प्रताप सिंह असे आहे.
सणसवाडी येथील वाईन शॉप मधुन भानु प्रताप सिंह याने 31 मे 2023 रोजी ला वाईन शॉप बंद केल्यानंतर शॉप मधुन दोन लाख पंचवीस हजार रुपये घेऊन फरार झाला होता. दुसऱ्या दिवशी वाईन शॉप चा माल देण्यासाठी टेम्पो चालक आल्यानंतर भानु सिंह हा फरार झाल्याचे उघड झाले तेंव्हा विनस वाईन शॉप चा मालक वासुमल लालचंद मानकानी वय 65 रा.मित्रनगर छत्रपती संभाजी नगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन, शिक्रापूर पोलिसांनी भानु प्रताप सिंह रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे मुळ.रा. जुराखान खेडा ता. उन्नाव जि. उन्नाव उत्तरप्रदेश गुन्हा दाखल केला होता मात्र सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांना गुंगारा देत आरोपी फरार झाला होता त्यानंतर भानु प्रताप सिंह हा वाराणसी मध्ये असल्याबाबतची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस नाईक रवी करण जाधव व संतोष मारकड यांनी थेट वाराणसी गाठली मात्र भानु प्रताप सिंह पुन्हा फरार झाला. मात्र पोलिसांनी पुन्हा माहिती काढत लखनऊ गाठले जेथे जात भानु प्रताप सिंह मुळ.रा. जुराखान खेडा ता. उन्नाव जि. उन्नाव उत्तरप्रदेश याला ताब्यात अखेर जेरबंद करून शिक्रापूर पोलीस स्टेशन ला हजर केल आहे.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/7769871685