
चावरे येथील नरवीर शिवा काशीद नाभिक समाज चावरे यांच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी बारा वाजता फोटो पूजन तसेच फुले वाहण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर श्री हनुमान भजनी मंडळ चावरे यांच्यातर्फे भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला .यानंतर महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते . सर्व कार्यक्रमाचे नियोजन समाजाचे अध्यक्ष सचिन गायकवाड उपाध्यक्ष अमोल काशीद सचिव सागर काशीद सेक्रेटरी सुजित गायकवाड सल्लागार युवराज गायकवाड व सदस्य अरविंद गायकवाड प्रशांत गायकवाड राजेंद्र गायकवाड दिगंबर गायकवाड मच्छिंद्र गायकवाड अभिजीत गायकवाड पुंडलिक गायकवाड उदय गायकवाड विशाल काशीद हे सर्व सदस्य आणि सर्व महिला भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला