
सुदर्शन मंडले
(जुन्नर तालुका प्रतिनिधी )
ओतूर :- नगर कल्याण महामार्गावर ओतूर येथील ढमालेमळा येथील कृष्णकुंज बंगल्या जवळ पिकप आणि मोटरसायकलचा अपघात होऊन मोटर सायकल स्वार ठार झाल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
अधिक माहिती अशी की मंगळवार दि.१९ रोजी सकाळी १२.३० च्या सुमारास पंकज सोपान वामन (वय ३७) व पत्नी प्रियांका वामन रा. काळवाडी ता.जुन्नर हे आळेफाट्याच्या दिशेने मोटरसायकलवरून एम.एच ०७ बी२७७२ येत असताना पिकप एम.एच. १४ एच.यु ३०६९कल्याणच्या दिशेने जात असताना ओतूर येथील ढमालेमळा येथील कृष्णकुंज बंगल्या जवळ भीषण अपघात झाला यात मोटर सायकल स्वार पंकज वामन जागीच ठार झाला असून पत्नी जखमी झाली आहे,पंकज वामन यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे आणले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पिकप चालक बाबुराव पोपट कुऱ्हाडे रा. निमसेमळा रोड आळे ता.जुन्नर पीकप जाग्यवरच सोडून फरार झाला झाला असून चालका विरुद्ध फिर्याद दाखल झाली आसून पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुरेश गेंगजे करत आहे.फोटो :- आपघात मृत्यू झालेले पंकज सोपान वामन