
चाकण नाणेकरवाडी….जिल्हा परिषद शाळेतील श्रीमती मनिषा धुमाळ /देवरे यांना पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विविध शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या मनिषा धुमाळ या विद्यार्थी घडविताना सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांचे जादा तास घेऊन मार्गदर्शन करतात. राज्य पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीस त्यांचे मार्गदर्शक लाभले. नाणेकरवाडीच्या सलग शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी येण्यामध्ये देखील त्यांचा सहभाग आहे. शाळेतील शैक्षणिक- क्रीडा-सांस्कृतिक विकासात देखील त्यांचे नेहमीच मार्गदर्शन व सहभाग असतो. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड ,गटशिक्षणाधिकारी श्री अमोल जंगले, विस्तारअधिकारी श्री. जीवन कोकणे, श्रीरंग चिमटे,केंद्रप्रमुख हिरामणदादा कुसाळकर, नाणेकरवाडीचे मुख्याध्यापक संदिप महादू नाणेकर व सर्वशिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती धुमाळ मॅडम यांचे नाणेकरवाडीचे सरपंच श्री.संदेश साळवे ,उपसरपंच सौ. पूनम नाणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संजय जाधव तसेच समस्थ, ग्रामस्थ ,पालक यांनी अभिनंदन केले.*