


हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डेहणे ता खेड, जि- पुणे येथे महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वच्छता सेवा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी राष्टीय सेवा योजना विभागातील स्वयसेवकांनी सकाळी 10 ते 12 या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरातील स्वच्छता, मैदानातील स्वच्छता केली, या वेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा पावरा सिलदार, सहसमन्व्यक प्रा पुष्पा घोडे, प्रा कदम, प्रा महेश रानवडे व प्रद्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या प्रा सिलदार पावरा यांनी विध्यार्थ्यांना महात्मा गांधी यांची श्रमदान ही संकल्पना तसेच श्रमदानाचे महत्व समजावून सांगितले.श्रमदानं झाल्यानंतर विध्यार्थ्यांना अल्पोउपहार देण्यात आला व शेवटी प्रा पुष्पा घोडे यांनी आभार माणून या कार्यक्रमाची सांगता केली.