
चाकण वार्ताहर: दि. 4 ऑक्टोबर
मेंदूचा विकास होणे आवश्यक आहे, पालकांनी मुलांची बौद्धिक क्षमता वाढविण्याकडे लक्ष द्यावं असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दीपक पावसे सर यांनी केले.

चाकण येथील संतोष ऑल रॉऊंडर अँकॅडमीमधून आंतरराष्ट्रीय गणित महामंडळ, तैवान, (IAMA, Taiwan) आयोजित 17 सप्टेंबर 2023 रोजी चाकणच्या मान्यताप्राप्त केंद्रातून अबॅकसची आंतरराष्ट्रीय ग्रेडिंग परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला चाकण सेंटरमधून 81 विद्यार्थी अबॅकसच्या परीक्षेला बसले होते. या परीक्षेमध्ये गणिताचे कठीण 30 ते 50 विविध प्रकारचे गणितीय उदाहरणे 3 मिनिटांमध्ये

सोडवायची असतात. असे या परीक्षेचे स्वरूप असते. या परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा चाकण येथे संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चार्टर्ड अकाऊंटंट श्री निलेश रेटवडे आणि
अमोल बाळकृष्ण मोरडे, मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांचे प्रतिनिधी आदर्श शिक्षक श्री मधुकर संधान सर उपस्थित होते. यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले.
कौतुक सोहळ्यासाठी चाकण पंचक्रोशीतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

कौतुक सोहळ्यामध्ये परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तैवानमधून प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. अकॅडेमीचे डायरेक्टर, आंतरराष्ट्रीय गणित महामंडळाचे भारताचे प्रतिनिधी डॉ. प्रविण आघाव आणि प्राचार्या सौ. अर्चना आघाव यांनी अभिनंदन केले.
मिसबा काझी आणि सुजा प्रकाश यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. हसीना इनामदार यांनी आभार प्रदर्शन केले,
अशी माहिती अकॅडेमीचे डायरेक्टर डॉ. प्रविण आघाव यांनी दिली.
संपर्क प्रा. प्रवीण आघाव 9604777827