
प्रतिनिधी लहू लांडेबातमी – नुकतीच सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादित संचालक मंडाळाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक वरती कायदेशीर सल्लागार पदी ॲड. संजय सावंत (पाटील) यांची आधिकृतपणे निवड करण्यात आली

. ॲड. संजय सावंत हे गेली अनेक वर्षे पुणे जिल्हा व सञ न्यायालयात अनेक वर्षे वकीली व्यवसाय करत आहेत. प्रामुख्याने फौजदारी, दिवाणी तसेच कौटुंबिक क्षेत्रात महाराष्ट्रातील विविध न्यायालयात काम करत आलेले आहे. सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंत अनेक पिडीत महिलांना सुध्दा कायदे विषयक मदत त्यांनी केलेली आहे. यासोबतच खरेदी – विक्री व बँक संदर्भातील सर्व प्रकारचे दस्ताऐवज दुय्यम निंबधक यांच्या समोर नोंदवून घेणे. या सर्व सामाजिक व वकीली व्यवसायातील कामाची दखल घेऊन सर्व बँक संचालक कमिटीने

ॲड. संजय दत्ताञय सावंत (पाटील) यांना पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादित वरती कायदा (विधी) विभाग मध्ये वकील पँनेल वरती कायदेशीर सल्लागार म्हणून निवड केलेली आहे.यासंदर्भात बिगरशेती कर्ज विभागाचे कर्ज अधिक्षक मा.श्री शिवाजीराव नांगरेपाटील साहेब यांनी आधिकृत पञ जाहिर केल्यानंतर पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकचे विद्यमान अध्यक्ष मा. प्रा. डाँ. दिंगबर दुर्गाडे साहेब यांच्या हस्ते गुरुवार 5 आँक्टोबर 2023 रोजी ॲड. संजय सावंत (पाटील) यांना देण्यात आले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. विजय टापरे साहेब तसेच आधी मान्यवर उपस्थित होते. नियुक्ती झाल्यानंतर ॲड. संजय सावंत (पाटील) यांनी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक कमिटी आणि बँक मुख्य कार्यालय कर्मचारी वर्गाचे मा. अध्यक्ष साहेबांन समोर जाहीर आभार व्यक्त केले.
