
प्रतिनिधी लहु लांडे
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ लता सावळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता पहिली ते चौथी सर्व विद्यार्थी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त खाद्य स्पर्धेत

सहभाग घेतला स्पर्धेचे परीक्षण शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व महिला सदस्या त्याचबरोबर माता पालक संघाच्या सर्व महिला सदस्या या सर्वांनी परीक्षण म्हणून काम पाहिले प्रत्येक वर्गातून

एक प्रथम क्रमांक काढण्यात आला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले शालेय पोषण अंतर्गत आंतरराष्ट्रीय तृणधान्यापासून बनवलेले पदार्थ विद्यार्थ्यांनी प्रशालेत बनवून आणले त्यामध्ये

ज्वारी बाजरी गहू तांदूळ नाचणी यांपासून बनवलेले उत्कृष्ट पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवून आणले सदर कार्यक्रमास प्रशालेचे शिक्षक प्रतिनिधी श्री राजेंद्र जाधव सर शालेय पोषण आहार प्रमुख सौ संगीता मंडलिक मॅडम सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री नाझीरकर सर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याची सर्व माहिती आपल्याला शरीरासाठी आवश्यक असणारे घटकांची माहिती श्री सुरेश पिंगळे सर यांनी दिली तसेच इयत्ता पहिली ते चौथी वर्गाचे सर्व वर्गशिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते नेहरू बालक मंदिर चाकण प्रशालेच्या सर्व वर्गशिक्षिका उपस्थित होत्या अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला*
