

खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथील फिर्यादी महिला आपल्या कुटूंबा बरोबर शेतीकरून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्या महिलेच्या पतीच्या नावावर असलेल्या शेतीचा रस्ता शेजारील एका व्यक्तीने अडवला होता. तो रस्ता मोकळा करण्यासाठी फिर्यादी महिलेच्या पतीने खेड तहसीलदार, तलाठी, सर्कल यांना पत्रव्यवहार करून तो कसा मोकळा होईल या दृष्टीने प्रयत्न सुरु केले होते.त्यावर ज्या ठिकाणी रस्त्याचा वाद होता त्याठिकाणी स्वतः वरील अधिकारी हे उपस्थित राहून त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पंचनामा करून अधिकारी तेथून निघून गेले असता आरोपी तानाजी काळुराम दौंडकर यांने गावाचे सरपंच यांच्या समोर महिलेशी अश्लील शेरेबाजी करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्यामुळे आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ३५४, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा एका नामांकित सहकारी बँकेत वसुली अधिकारी म्हणून काम बघत असल्याचीही माहिती मिळाली आहे. ही घटना २७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अभिजित चौगुले हे करीत आहेत. प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले अस्सल न्यूज महाराष्ट्र 24
