

हिंजवडी पोलीस ठाणेत दिनांक २५/०९/२०२३ रोजी खबर देणार रेणुका किशोर पवार वय ३० हीने खबर दिली की, तिचा पती किशोर प्रल्हाद पवार वग-३५ रा. सुसगाव ता. मुळशी जि. पुणे हा दिनांक २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०४/०० या पासून घरातुन कोणास काही एक न सांगता निघुन गेला आहे. त्याप्रमाणे मनुष्य मिसिंग रजि. नं. १८०/२०२३ प्रमाणे दाखल आहे.
सदर मनुष्य मिसिंगचा तपास सहा. पो. फौजदार हरीभाऊ रणपिसे
करीत असताना नमुद मनुष्य
मिसिंग मधील प्रकार हा संशयास्पद असल्याने सर्व शक्यता गृहीत धरून मा. वरिष्क्ष पोलीस निरीक्षक डॉ. विवेक
मुगळीकर यांनी हिंजवडी पो स्टे गुन्हे शोध पथकातील स.पो.नि. सागर काटे, स.पो.नि. राम गोमारे व गुन्हे पथकातील
अंमलदार यांना मार्गदर्शन करून समांतर तपास करणेबाबत आदेशित केले.
गुन्हे पथकातील अधिकारी व अंमलदार है समांतर तपास करीत असताना मिसिंग व्यक्ती किशोर प्रल्हाद पवार हा दिनांक २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ५७/३० वा. चे सुमारास त्याचा मित्र अक्षय भास्कर खिल्लारे वय २१ रा. दसरा चौक बालेवाडी पुणे मुळ गांव मु.पो. जसेगांव ता. वसमत जि. हिंगोली याची मोटरसायकल वरुन कोठेतरी गेला असल्याची माहिती समोर आली. त्यावरून अक्षय खिल्लारे यांस ताबेत घेवून कसून विचारपुस करीत असताना अक्षय भास्कर खिल्लारे याने सांगितले की, मिसिंग व्यक्ती किशोर पवार याची पत्नी रेणुका पवार हिचेशी त्याचे अनैतिक संबंध आले. याबाबत किशोर याला माहिती झालेने तो त्या दोघांवर संशय घेवु लागला त्यामुळे अक्षय खिल्लारे | याने दिनांक २४/०९/२०२३ रोजी किशोर पवार याचा खुन करण्याचे उददेशाने कमरेला विळा अडकावुन किशोर पवार याला फोन वरून ” माझ्या एका मित्राचा अपघात झाला आहे माझेसोबत चल” असे खोटे सांगुन सायंकाळी १७/३० वा. त्याचे राहते घरातुन सुसगांव ता. मुळशी जि. पुणे येथुन मोटरसायकलवरून वारक या गावातील मुळशी डॅमचे धरणाचे पाण्यात ता. मुळशी जि. पुणेचे जवळ घेवुन जावुन लघवी करण्याचा बहाणा करून पाठीमागुन विळ्याने त्याचे मानेवर व | चेहऱ्यावर वार करून त्यास जिवे मारुन कोणाला सापडु नये यासाठी त्याचे कपडयाने त्याचे हात पाय बांधुन वारक या गावातील मुळशी डॅमचे धरणाचे पाण्यात ता. मुळशी जि. पुणे येथे टाकले असे सांगितले. त्याचे सांगणेप्रमाणे यातील मिसिंग व्यक्तीचे प्रेत त्याने दाखविलेल्या घटनास्थळी मिळुन आल्याने त्यास अटक केली.
हिंजवडी पोलीसांनी सदर प्रकरणी गु.र.नं. १११८/२०२३ भा.द.वि. कलम ३६४, ३०२, २०१ प्रमाणे आरोपी अक्षय मास्कर खिल्लारे वय २१ रा. दसरा चौक बालेवाडी पुणे मुळ गांव मु.पो. आसेगाव ता. बसमत जि. हिंगोली याचेवर गुन्हा दाखल करून त्यास सदर गुन्हयात दिनांक ०३/१०/२०२३ रोजी ००/५० वा. अटक करण्यात आली असुन | हिंजवडी पोलीसांनी बेपत्ता व्यक्तीचा तपासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. अजितकुमार खटाळ राहायक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. श्री विनयकुमार चाँचे सी, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, मा. श्री. मा. डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त | श्री काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, मा. श्री डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, मा.श्री डॉ. विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस | निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे, मा. श्री सुनिल दहिफळे, सोन्याबापू देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे) हिंजवडी पोलीस
ठाणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील सागर काटे, राम गोमारे, अजितकुमार खटाळ, सहा. पोलीस निरीक्षक, बंड मारणे, बापुसाहेब धुमाळ बाळकृष्ण शिंदे, सहा. पोलीस उप निरीक्षक पो हवा कलारा कंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, सुनिल डामसे, अरुण नरके, | नरेश बलसाने पोलीस नाईक रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, पोलीस शिपाई अमर राणे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे व दत्तात्रय शिंदे, सागर पंडीत यांनी केली.
( काकासाहेब डोळे) पोलीस उप आयुक्त, , परि-२ पोलीस आयुक्तालय पिपरी चिचंवड
