नारायणगांवप्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हे गुरुवारी नारायणगाव येथे लोकसभा प्रवास योजनेच्या निमित्ताने घर चलो अभियान आणि संवाद कार्यक्रमासाठी येत आहेत.

Spread the love

या कार्यक्रमाची माहिती व तपशील आज नारायणगाव येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. यावेळी जुन्नरच्या विधानसभा निवडणूक प्रमुख महिला नेत्या आशाताई बुचके, तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे, जिल्हा सचिव आशिष माळवदकर उपस्थित होते.
भारताचे सामर्थ्यशाली पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या 9 वर्षात केलेले काम सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी घर चलो अभियान आणि बूथ सशक्तीकरण साठी प्रत्येक विधानसभेतील सुपर वॉरियर्स कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब 12 ऑक्टोंबर रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत असून दिवसभरात शिरूर लोकसभा मतदारसंघातील,जुन्नर,आंबेगाव आणि खेड – आळंदी विधानसभेतील कार्यकर्त्यांशी नारायणगाव येथे तर शिरूर – हवेली, हडपसर आणि भोसरी विधानसभेतील कार्यकर्त्यांशी भोसरी येथे असे मिळून 1000 प्रमुख कार्यकर्त्यांची ते थेट संवाद साधणार आहेत. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, लोकसभा प्रवास योजना राज्य संयोजक संजय (बाळा ) भेगडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्ह्याचे प्रभारी राजेश पांडे, पक्षाचे जिल्ह्याचे समन्वयक आमदार राहुलदादा कुल, लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार महेशदादा लांडगे यांचेसह पक्षाचे तालुका जिल्हा आणि राज्यपातळी अनेक नेते उपस्थित राहणार आहेत
नारायणगाव बाजारपेठ येथे प्रदेशाध्यक्ष स्वतः सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांसह सामान्य व्यावसायिक, शेतकरी,महिला,युवक, बारा बलुतेदार, अनुसूचित जाती जमाती यासह विविध समाज घटकाशी थेट संवाद करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेल्या लोकहिताच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत असतानाच ते सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहेत.
प्रत्येक विधानसभेतील 100 ते 125 सुपर वॉरियर्स कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.यामध्ये त्या विधानसभेतील विधानसभा निवडणूक प्रमुख,पक्षाचे सर्व पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधी,कार्यशील कार्यकर्ते यांचा समावेश आहे. या सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येकी दोन ते तीन बूथ ची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी जबाबदारी दिलेल्या बूथ वर प्रवास करून बूथ सशक्तिकरण करणे,बूथची रचना,व्हॉट्सॲप ग्रूप करून त्यांना प्रदेशशी जोडणे, नव मतदार नोंदणी करणे,घरोघरी संपर्क करणे, पक्षाच्या सरल ॲप शी सर्वांना जोडणे, मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे, केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, स्थानिक प्रश्न पक्ष नेतृत्वाकडे मांडून त्याची सोडवणूक करणे आदी सर्व कामे याप्रमुख कार्यकर्त्यांकडून केली जाणार आहेत.
या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष या सर्व विषयासंदर्भात थेट प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षाने या संकल्प व संवाद दौऱ्याची जय्यत तयारी केली असून दोन ते तीन हजार प्रमुख कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष यांचे समवेत घर चलो अभियानात सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents