

युवकांनी वाचवले स्थलांतरित पक्षाचे प्राण* शिवे गावा मध्ये एका व्यक्ती पक्षांची पिली घेऊन जाताना प्रतिक गडदे यांनी पाहिले असता त्या व्यक्तीस हटकले तर त्या व्यक्तीने पक्षी देण्यास नकार दिला तेव्हा शिवेगावातील प्राणी मित्र गणेश गडदे, समीर गडदे, प्रवीण करपे, प्रथमेश शिंदे यांनी वन अधिकारी योगिता वीर व पाटोळे भाऊसाहेब यांना कल्पना दिली असता त्या व्यक्तीने लोकरी मानेचा करकोचा जातीच्या पक्षाची दोन्ही पिले प्राणी मित्रांच्या स्वाधीन केली. त्यानंतर लगेच ज्या ठिकाणाहून ती पिले आणली होती त्या खंडोबा वस्ती शिवे जवळील पानवट्याशेजारी त्यांना वनविभागाच्या मदतीने सोडण्यात आले.

