
पुणे, ता. १२ ऑक्टोबर २०२३: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी पिंपरी चिंचवड येथील केंद्रावर प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेचे स्पर्धाप्रमुख शिवाजी शिंदे यांच्या हस्ते नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . परिक्षक राजीव जोशी , संजय डहाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविक करताना स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे म्हणाले
स्पर्धेचे हे १४वे वर्षे आहे. स्पर्धेसाठी पाच केंद्र असून प्रत्येक केंद्रावर पाच पाच संघ स्पर्धेसाठी येणार आहेत प्रत्येक केंद्रावरील येणाऱ्या संघातून एकच संघ पुढे मुंबईला अंतिम स्पर्धेसाठी दाखल होईल. पहिल्यांदाच एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या शिरूर शाखेचे देखील स्पर्धाप्रमुख शिवाजी शिंदे यांनी कौतुक केले . परीक्षक राजू जोशी , संजय डहाळे यांनी मनोगत व्यक्त केले .स्पर्धेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा शिरूरच्या स्पर्धकांना अभिनयाची तीन प्रमाणत्रे मिळाली आहेत, अशी माहिती शिरूरच्या शाखा अध्यक्षा दिपाली शेळके यांनी दिली.
शिरूर शाखेचे कोषाध्यक्ष बाळासाहेब शेळके, राजाराम सकट , उपस्थित होते. स्वागत राजू बंग, यांनी केले सूत्रसंचालन गौरी लोंढे यांनी केले तर आभार संतोष रासने यांनी मानले .
शिरूरचे एकांकिकेचे सहभागी कलाकार पुढीलप्रमाणेः
एकांकिका – भोकरवाडीचा शड्डू
लेखक – अजय पाटील
दिग्दर्शक – गहिनीनाथ डफळ
दीपक मोरे – गणा मास्तर
प्राजक्ता लोटांगणे – गणा मास्तर ची बायको
आशा सकट – मंगली
विनायक वाळके – चेंगट
डॉ. शिवाजी शेळके – पैलवान बाबू
अमोल वारे – रामा खरात
भूषण घोलप – जमदाडे
शुभम सोनवणे – गावकरी
रवींद्र तेलधूने – मंगलीचा बाप
इतर विजेते पुढीलप्रमाणेः
निर्मिती
सर्वोत्कृष्ट – जाहला सोहळा अनुपम ( शाखा अहमदनगर )
उत्कृष्ट – अल्पविराम (शाखा पिंपरी – चिंचवड)
दिग्दर्शक
सर्वोत्कृष्ट – डॉ. अभिजीत दळवी (जाहला सोहळा अनुपम )
उत्कृष्ट – मनोज डाळिंबकर (अल्पविराम )
स्त्री अभिनय
ऋतुजा शिरगावकर (बायको )
शाखा कोथरूड (एकांकिका गप्पा )
आशा सकट (मंगली)
शाखा शिरूर ( एकांकिका भोकरवाडीचा शडडू)
प्राजक्ता लोटांगणे ( बायको )
शाखा शिरूर ( एकांकिका भोकरवाडीचा शड्डू )
पुरुष अभिनय
ॲड. दीपक शर्मा – वृध्द आजोबा
शाखा अहमदनगर (जाहला सोहळा अनुपम)
विनायक वाळके -चेंगाट
शाखा शिरूर (भोकरवाडी चा शड्डू )
आकाश थिटे – मिहीर
शाखा पिंपरी चिंचवड (अल्पविराम)
रवींद्र देवधर – म्हातारा
शाखा पुणे (मी भारतीय)

