



भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष पूर्ण झाली असून या अमृतमहोत्सवी संपूर्ण देशात “मेरी मिट्टी मेरा देश अभियान” राबवले जात आहे. १ कोटी सेल्फी काढून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करून नवीन विक्रम नोंदवण्याचा संकल्प भारताचे सरकार ने केलेला आहे.
या संकल्प पूर्ती साठी योगदान देण्यासाठी आज कडूस येथील डायनॅमिक इंग्लिश मिडीयम स्कूल च्या डायरेक्टर मा.सौ.जयश्री गारगोटे यांच्या मदतीने आज शाळेत अभियान राबविण्यात आले असून देशात राहत असताना आपण देशाची सेवा करणे आपले प्रार्थमिक कर्तव्य असल्याचे सांगितले. भाजपा तालुका संगठन सरचिटणीस अक्षय प-हाड यांनी अभियानाचा हेतू समजून सांगितला अभियानात ३५० विद्यार्थी व शिक्षक यांनी अभियानात सहभाग नोंदवला.
सदर अभियानात चिटणीस निखिल सांडभोर ,विस्टरक ओंकार सोनार ,विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष रवी वाडेकर , पदवीधर संयोजक प्रणव केदारी व इतर पदाधिकारी उस्थित होते
