डॉ. प्रवीण आघाव यांना क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Spread the love

चाकण : वार्ताहर
दि. 2 ऑक्टोबर

चाकण येथील श्री एस पी आघाव पाटील शिक्षण संस्था सचिव आणि संतोष ऑल राऊंडर अकॅडमीचे डायरेक्टर यांना सण 2012 सालापासून चाकण येथे शिक्षण संस्था आणि अकॅडमीच्या माध्यमातून शैक्षणिक उल्लेखनीय योगदान आहे. 100% हमी देणारे शिक्षण देण्यामध्ये आघाव यांचा हातखंड आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडविले आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता, बौद्धिक क्षमता वाढविणारे प्रमाणित कोर्सेस शिकवितात.

याची दखल घेत निर्वाण फाउंडेशन, नाशिक आयोजित राज्यस्तरीय सावित्री ज्योती सन्मान पुरस्काराच्या अंतर्गत क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले जीवनगौरव पुरस्कार रोटरी कम्युनिटी हॉल नाशिक येथे सन्मानपूर्वक देण्यात आला.
प्रसिद्ध अभिनेत्री सायली पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय पगारे, मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला.

मानाचा फेटा, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार म्हणजे आघाव यांनी केलेल्या कामाची पावती आहे आजपर्यंत असंख्य राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रकारचे पुरस्कार आघाव यांनी मिळवलेले आहेत.

सोबत फोटो दिलेला आहे.

संपर्क 9604777827

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents