
चाकण वार्ताहर: दि. 2 नोव्हेंबर
आंतरराष्ट्रीय अबकस गणित महामंडळ, भारत्यांच्याकडून चाकणच्या संतोष ऑल राऊंडर अकॅडमी या मान्यताप्राप्त केंद्रातून अबॅकसची आंतरराष्ट्रीय ग्रेडिंग परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला चाकण सेंटरमधून 81 विद्यार्थी अबॅकसच्या परीक्षेला बसले होते. या परीक्षेमध्ये गणिताचे कठीण 30 ते 50 विविध प्रकारचे गणितीय उदाहरणे 3 मिनिटांमध्ये सोडवायची असतात. असे या परीक्षेचे स्वरूप असते. ही परीक्षा भोसे येथील कुमारी श्रुती दिलीप गांडेकर इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये शिकणारी विद्यार्थिनी 100% गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
श्रुती हिला प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अकॅडेमीचे डायरेक्टर, आंतरराष्ट्रीय गणित महामंडळाचे भारताचे प्रतिनिधी डॉ. प्रविण आघाव आणि प्राचार्या सौ. अर्चना आघाव यांनी अभिनंदन केले. अशी माहिती अकॅडेमीचे डायरेक्टर डॉ. प्रविण आघाव
शुभेच्छुक समस्त ग्रामस्थ मंडळी भोसे
एम ग्रुप भोसे महादेव मित्र मंडळ भोसे
यांनी दिली.
