
प्रतिनिधी लहूजी लांडे
खेड पोलीस स्टेशनकडे गुन्हा रजि नंबर ९२० / २०२३ भा.द.वि कलम ४६१, ३८०, ३४ प्रमाणे दिनांक २९/१०/२०२३ रोजी दाखल झालेला होता. त्यामध्ये तिन्हेवाडी रोड राजगुरूनगर येथील सोयाबिन गोडावून मध्ये गोडावूनचे कुलुप तोडुन सोयाबिनचे कट्टे चोरीस गेलेले होते. तसेच संतोष केरूभाऊ शिर्के यांचे शिर्के सेल्स कार्पोरेशन या दुकानासमोरील उभे असलेल्या पिकअप मधुन सोयाबिनच्या गोण्या चोरीस गेल्याबाबतची तकार प्राप्त होती. मा. पोलीस अधिक्षक अंकीत गोयल सो, यांनी सदर गुन्हाचा सखोल तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना राजकुमार केंद्रे पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन यांना दिल्या त्यानुसार मा. अपर पोलीस अधिक्षक श्री मितेश गटटे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास सुरू केला.
खेड पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक खबाले, पोलीस हवालदार मोरे ब. नं २००, पोलीस नाईक गैंगजे ब. नं २४७४ पोलीस अंमलदार भंडारे ब.नं १९६८, पोलीस अंमलदार शिंगाडे ब. नं १३९४ यांना योग्यते मार्गदर्शन करून सूचना दिल्या त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनिय बातमीदाराचे मदतीने सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करून गुन्हयात आरोपी नामे १) समीर गेनभाउ आहेरकर, वय २० सध्या रा. ढगेवस्ती, आरूडेवाडी, ता. खेड, जि. पुणे मुळ रा. अहिरे, ता. खेड, जि. पुणे. २) अविनाश सोपान राक्षे, वय २० रा. वरची भांबुरवाडी, ता. खेड, जि. पुणे. ३) ऋतिक अरूण तांबे वय १९ वर्षे, सध्या रा. समृध्दीनगर चाकण, ता. खेड, जि. पुणे. मुळ रा. तिन्हेवाडी. ता. खेड, जि. पुणे. ४) प्रफुल किसन धंद्रे वय २४ वर्षे, सध्या रा. गढईमैदार, खेड, ता. खेड, जि. पुणे. मुळ रा. घोटवडी, ता. खेड, जि. पुणे. असे एकुण ०४ आरोपी व एक विधीसंघर्षित बालक निष्पन्न करून त्यांना अटक करून त्यांचेकडुन सोयाबिनचे सर्व कट्टे व एक पिकअप गाडी असा एकुण ६,६२,००० रूपयांचा माल हस्तगत केला. तसेच सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ९६४ / २०२३ भा. द. वि कलम ३८० प्रमाणे दाखल गुन्हयातील महींद्रा शो रूम पुणे नाशिक हायवे रोड राजगुरूनगर येथुन एकुण ०३ पिकअप गाडीचे स्टेपनी टायर एकुण किंमत ३७,५००/- रूपयांचे टायर चोरी केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेकडुन ते स्टेपनी टायर गुन्हयाचे पुराव्याकामी जप्त करण्यात आले आहेत. असा एकुण ६,९९,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासात पोलीस उपनिरीक्षक खबाले, सहा पोलीस फौजदार एस. डी. भवारी, पोलीस हवालदार मोरे ब. नं २००, पोलीस हवालदार लांडे ब. नं २०७४, पोलीस नाईक गैंगजे ब. नं २४७४ पोलीस अंमलदार भंडारे ब. नं १९६८, पोलीस अंमलदार शिंगाडे ब. नं १३९४, पोलीस अंमलदार लोहार ब.नं १४१७, खेड पोलीस स्टेशनकडील सर्व पोलीस स्टाफ तसेच तपासाकरीता सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार चेतन पाटील यांनी योग्यती मदत केली गुन्हा उघडकीस आणल्याने शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे ब. नं २०० नेमणुक खेड पोलीस स्टेशन है करीत आहेत
