
प्रतिनिधी संतोष टाकळकर
खेड तालुक्यातील 11 गावांमध्ये प्राथमिक विकासाच्या पाणलोट क्षेत्र अंतर्गत दोन दिवसाचे शेतकरी अभ्यास दौऱ्याचे नियोजन केलेले आहे.
यामध्ये नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी येथे भेटीचे नियोजन केलेले आहे.
येथे एकत्रितपणे समूह शेती कशी करणे किंवा शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करणे, त्याचबरोबर गावचा विकास कसा करणे अशा अनेक गोष्टींचे मार्गदर्शन येथे केले जाणार आहे.
खेड तालुका कृषी विभागामधील
नंदू वाणी तालुका कृषी अधिकारी, मराडे साहेब मंडळ कृषी अधिकारी, शिंदे साहेब मंडल कृषी अधिकारी, योगेश प्रहार कृषी पर्यवेक्षक, झांजरे साहेब कृषी सहाय्यक, तसेच
गरजे मॅडम मिडगुले मॅडम व बहुले मॅडम कृषी सहाय्यक अधिकारी
आणि दिनेश सावंत कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा होणार आहे. यामध्ये खेड तालुक्यातील 11 गावांचा समावेश असून संतोष बोर्डे संतोष गार्डी उमेश रांजणे भिका अण्णा ढेरंगे शिवाजी वायाळ अशा 11 गावांमधील एकूण 32 ते 35 शेतकऱ्यांनी या सहलीमध्ये सहभाग नोंदवून अभ्यास दौरा पूर्ण केला.