
प्रतिनिधी संतोष टाकळकर
सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा खेड तालुका यांच्यावतीने सलग 35 दिवस कीर्तन महोत्सव करण्यात येत आहे. यासाठी कल दिनांक 20/11/2023 सायंकाळी पाच वाजता घट भरून वीणा पूजन करण्यात आले. वीणा पूजन करण्यासाठी ह.भ.प. डावरे महाराज, ह.भ.प विलास महाराज शिंदे, ह.भ.प दौंडकर महाराज, चेअरमन तुकाराम सावंत, ह.भ.प सुभाष महाराज जैद, ह.भ.प प्रतीभा ताई पवार महाराज,मनोहर वाडेकर शुभम बालघरे,आदी मान्यवर उपस्थित होते.वीणा पूजन झाल्यानंतर हरिपाठ घेण्यात आला व हरिपाठ झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज पिंगळे ज्ञानेश्वर महाराज पिंगळे आळंदीकर यांची कीर्तन सेवा झाली.
तसेच दुसऱ्या दिवशी 21/11/2023 रोजी ह.भ.प शंकर महाराज शेवाळे आंबेगाव यांचे कीर्तन सेवा झाली.
इथुन पुढे 24/12/2023 पर्यंत तालुक्यातील व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन कारांची कीर्तन सेवा होणार आहे तरी तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व वारकरी टाळकरी यांनी या कीर्तन महोत्सवात सहभाग घेऊन किर्तन महोत्सवाचा आनंद लुटावा .अशी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा खेड तालुका यांच्या वतीने सांगण्यात आले.