
प्रतिनिधी. लहू लांडे
दि. १८/१२/२०२३महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने खेचुन जबरी चोरी करणारे आरोपी व चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारांना गुन्हे शाखा युनिट-४ कडुन अटक चैन स्नोंचिंग १३. व वाहन चोरीचा ०१ असे एकुण-१४ गुन्हे उघड.१६,३०,०००/- रु किं चा मुद्देमाल जप्तदिनांक ०५/१२/२०२३ रोजी यशोदा मेडिकल जवळ, महाराष्ट्र बैंक चौक, सांगवी येथे एक महिला व तिचा पती असे सकाळी ०६:२० वा चे दरम्यान मॅर्निंग वॉक करत असताना एका काळया रंगाचे प्लसर मोटारसायकल वरुन आलेल्या दोन इसमांपैकी पाठी मागे बसलेल्या इसमाने सदर महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावुन घेवुन गेल्याने सदर प्रकाराबाबत सांगवी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ६३१/२०२३ भा.द.वि.कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा नोंद होता, सदरचे प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड, श्री. विनयकुमार चौबे साो, यांनी सदर बाबत गुन्हे शाखेस लक्ष घालुन आरोपी अटक करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.त्यानुसार आम्ही स्वतः तसेच सपोआ (गुन्हे) सतिश माने, सपोआ बाळासाहेब कोपनर यांनी तात्काळ दाखल गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवुन गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांना सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या,त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-४ चे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच घटनास्थळा पासुन आरोपी गेले त्या मार्गाचे सी.सी.टी.व्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली तेव्हा अशी माहिती प्राप्त झाली की सांगवी येथिल घटने नंतर काही वेळातच कासारवाडी येथे देखिल एका महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून घेवुन गेले असुन दोन्ही ठिकाणा वरील आरोपी हे एकच आहे.तेव्हा गुन्हे शाखा युनिट-४ सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, आणि पोहवा/मोहम्मद गौस नदाफ, पोहवा/ सुरेश जायभाये, पोशि/ सुखेदव गावंडे, पोशि/ धनाजी शिंदे, पोशि/ प्रशांत सैद, पोशि/ गोविंद चव्हाण असे स्टाफ यांनी सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करुन पोहवा/नदाफ, पोशि/गावंडे, पोशि/शिंदे यांना मिळालेल्या माहिती वरुन आरोपी नागे आनंद सुनिल साळुंखे उर्फ लोहार, वय-१९ वर्षे, रा-खडकी स्मशानभुमी जवळ, रेल्वे पटरी समोर, महादेववाडी, खडकी, पुणे यास शिताफीने ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करुन त्याचे कडे सखोल तपास केला असता त्याने त्याचा साथिदार पाहिजे आरोपी नामे महादेव ऊर्फ महाया ऊर्फ अजय गौतम थोरात, रा-खडकी याचे सह म्हाळुंगे पोलीस ठाणे हहितुन मोटारसायकल चोरी करुन सदर मोटारसायकल वरुन दाखल गुन्हा व्यतिरिक्त खालील गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी नामे आनंद लोहार याचे कडे खालील गुन्हयातील चोरी गेलेल्या मुद्देमाला बाबत चौकशी केली असता त्याने आरोपी नागे अक्षय अशोक मुरकुटे, वय-३१ वर्षे, रा-मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे व धिरज गोपाळ गवळी, वय-३१ वर्षे, रा. घर नंबर-४२७, गवळीवाडी, खडकी, पुणे यांचे मार्फत विल्हेवाट लावली. तसेच सदर चोरीचे दागिने घेणारे आरोपी नामे गणपत जवाहरलाल शर्मा, वय-४४ वर्षे, धंदा-अभिषेक ज्वेलर्स रा-मांगल्य सोसायटी, एल्फिस्टन रोड, खडकी, पुणे, दर्शन रमेश पारिख, वय-३२ वर्षे, धंदा-रमेश ज्वेलर्स रा- ४०३, निता कॉर्नर, खडकी, पुणे यांना विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने वरील सर्व आरोपीना दाखल गुन्हयात अटक करण्यात आले असुन त्यांचे कडुन खालील गुन्हयातील एकुण-२५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.१) सांगवी पोलीस ठाणे गु.र. नंबर-४१३/२०२३ भा.दं.वि.कलम-३९२.३४) सांगवी पोलीस ठाणे गु.र नंबर-५४७/२०२३ भा.दं.वि.कलम-३९२.३४ २ ३) सांगवी पोलीस ठाणे गु.र. नंबर-५८२/२०२३ भा.दं.वि.कलम-३९२.३४४) सांगवी पोलीस ठाणे गु.र. नंबर-६३१/२०२३ भा.दं. वि.कलम-३९२,३४ ५) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र. नंबर-१३१५/२०२३ भा.दं. वि. कलम-३९२,३४६) भोसरी पोलीस ठाणे गु.र. नंबर-८४९/२०२३ मा.दं. वि. कलम ३९२,३४ ७) भोसरी पोलीस ठाणे गु.र. नंबर-९७९/२०२३ भा.दं. वि. कलम ३९२.३४८) भोसरी एमआयडीसी पो ठाणे गु.र. नंबर-४५०/२०२३ भा.दं. वि. कलम ३९२.३४९) भोसरी एमआयडीसी पो ठाणे गु.र.नंबर-४९९/२०२३ भा.दं. वि. कलम-३९२,३४ १०) चिखली पोलीस ताणे गु.र.नंबर-७१२/२०२३ भा.दं. वि. कलम-३९२.३४११) म्हाळुंगे पोलीस ठाणे गु.र. नंबर-५२५/२०२३ भा.दं.वि.कलम-३९२,३४ १२) म्हाळुंगे पोलीस ठाणे गु.र.नंबर-६१५/२०२३ मा.दं. वि. कलम-३७९१३) विश्रांतवाडी पोलीस ठाणे गु.र. नंबर-३११/२०२३ भा.दं.वि.कलम-३९२.३४ १४) कोरेगाव पार्क पो ठाणे गु.र.नंबर-१३५/२०२३ भा.दं. वि. कलम-३९२.३४