
प्रतिनिधी. लहू लांडे
हकिगत अशी की, दिनांक १५/१०/२०२३ रोजी हिंजवडी पोलीस ठाणे येथे एका महिला फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की, त्यांना ८७९५३०७२५१ या मोबाईल क्रमांकधारक यांने व्हॉट्सअप मेसेजव्दारे व टेलिग्राम आयडी @AnanyaAnu023 यावरुन गुगल मॅपवर वेगवेगळ्या हॉटेल्स व रेस्टॉरंट यांना रिकू व रेटींग देणेचा जॉब असल्याचे सांगुन वेगवेगळे टास्क देवुन ते coinswitch या पोर्टलवर पुर्ण करण्यास सांगुन टास्क मधील रक्कम काढण्यासाठी @Varunpp1, @Sanjay898, @customer028, @finance546 अश्या वेगवेगळ्या टेलिग्राम आयडीवरुन संपर्क करुन विश्वास संपदान करुन त्यांना coinswitch या पोर्टलवर गुंतवणुक करण्यास सांगुन टास्क पूर्ण करुन मिळणारी रक्कम परत करण्याचे भासवुन त्यांचे कडुन वेळोवेळी एकुण रुपये ७५.८२.५२०/- रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याने हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र. नंबर-१०७४/२०२३ भा.दं. वि. कलम-४२०,४०६,४६७,४६८,४७१,१२० (ब),३४ आय.टी. अॅक्ट ६६ (ड) प्रमाणे गुन्हा नोंद होता. अशा प्रकारचे ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे देशभरात वारंवार घडत असल्याने व त्यात लोकांची मोठयाप्रमाणात आर्थिक फसवणुक होत असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, विनयकुमार चौबे सो, यांनी त्याबाबत गंभीर दखल घेवुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आम्हाला आदेशित केले होते.सदरचा गुन्हा हा गंभीर व तांत्रिक स्वरुपाचा असल्याने आम्ही गुन्हे शाखा, युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, यांचे कडे सदर गुन्हयाचा तपास वर्ग करून सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोउनि गणेश रायकर, पोशि/ प्रशांत सैद यांना सदर गुन्हयाबाबत तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते तेव्हा गुन्हे शाखा युनिट-४ चे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयात फिर्यादी यांनी ज्या विविध बैंक अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्सफर केले त्या बैंक अकाउंट बाबत माहिती घेतली. सदर घटने बाबत सखोल तांत्रिक विश्लेषण करुन यातील आरोपींचा शोध घेतला. एकुण १४ आरोपी निष्पन्न करून अटक करण्यात आली आहे.आरोपींनी यामध्ये तीन स्तरीय पध्दतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून यामध्ये पहिल्या स्तरावर यातील आरोपी हे गरीब गरजु व्यक्ती यांचा शोध घेवून त्यांच्यानाचे वेगवेगळ्या खाजगी बँकेत अकाऊंट व फर्म तयार करत होते, दुसऱ्या स्तरावर आरोपी हे पहिल्या स्तरावर तयार केलेले बैंक अकऊंट व फिट चेकबुक व इंटरनेट बैंकीम विकत घेत होते. तिसऱ्या स्तरावरील आरोपी हे ऑन लाईन टास्क देवुन त्याचा मोबदला देण्याचे पैशाचे आमिष दाखवुन पिडीतांशी व्हॉटसअॅप व टेलिग्राफ व्दारे संपर्क साधुन त्यांना आमिष दाखवून पिडीतांकडून पहिल्या स्तरावरील अकाऊंट मध्ये पैसेट्रान्सफर करुन घेत होते. त्यानंतर सदर निष्पन्न आरोपींबाबत नियोजनबद्ध तांत्रिक तपास करून आरोपीचे सद्यास्थितीतील ठावठिकाणे शोधुनआम्ही सपोनि अंबरिष देशमुख, पोउपनि गणेश रायकर, सपोउपनि नारायण जाधव, संजय गवारे, पोहवा / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, पोना/ वासुदेव मुंढे, पोशि/प्रशांत सैद, सुखदेव गावंडे यांची दोन पथके तयार करुन रवाना केल्यावर सदर पथकांनी रात्रंदिवस मेहनत घेवुन मध्य प्रदेश राज्यातील इंदौर, रतलाम, भोपाळ, राजस्थान राज्यातील जयपुर, उदयपुर, मिलबाडा गुजरात राज्यातील बडोदरा बिहार राज्यातील पाटणा येथुन खालील आरोपींना ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक केली आहे.१) चितन शशिकांत फड़के वय-३५ वर्षे, रा. ५०१, बी-३, न्युयोर्क सिटी टाउनशिप, निहालपुर मुंडी, इंदौर, मध्यप्रदेश२) ब्रजराज रामरतन वैष्णव वय १८ वर्षे, रा. रातकोट, विजयनगर, मिलवाड़ा, राजस्थान३) सुंदरदास चेतनदास रिस्पी, बय-२४ वर्षे, रा. वॉर्ड नं. १७, गुलाबपुरा, राजस्थान४) राजेश भगवानदार करमानी, वय-२६ वर्षे, रा. शिवाजी मोहल्ला, नबाब का बेड़ा, अज्जमेर, राजस्थान,५) मोहम्मद रशिद चांद मोहम्मद, बय-४७ वर्षे, रा-राजपुत मोहल्ला, राताकोट, अजमेर, राजस्थानअभिषेक सत्यनारायण पाराशर, वय-२४ वर्ष, रा-कोठडी मोहल्ला, रायला, ता बनेडा, जि-भिलवाडा, राजस्थान६) ७) आशिष प्रल्हादराय जाजु, वय-३५ वर्षे, रा-हाफटाऊन कंट्री बुडस सोसायटी, टिळेकरनगर, कोढवा, पुणे८) मोहम्मद रीफ मोहम्मद रशिद, वय-२४ वष, रा-मु.पो. राताकोट, ता-विजयनगर, जि-अजमेर नवीनकुमार नेवन्दराम आसनाणी, वय-४० वर्ष, रा. ६, नळकंठ कॉलनी, शास्त्रीनगर, मिलवाडा, राजस्थान,९) १०) विकारा सत्यनारायण पारिख, वय-२९ वर्षे, रा-आदर्श नगर, सांगानेर कॉलनी, मिलवाडा, राजस्थान११) सुरेश गोवर्धनदारा सिंधी, वय-३२ वर्ष, रा-रिधी कॉलनी, तेजाजी मंदिरा मागे, गुलाबपुरा, राजस्थान१२ ) गौरव महावीर सेन, वय-३१ वर्षे, रा- श्री राम मंदिरा मागे, गुलाबपुरा, राजस्थान१३) ललित नवरतन मल पारिक, वय-३३ वर्षे, रा. मु.पो. रुपाहेली, ता-हुई, जि-भिलवाडा, राजस्थान १४) मनिष ऋषिकेश वैष्णव, बय-३३ वर्षे, रा-शास्त्री नगर, गुलाबपुरा, जि-मिलवाढा, राजस्थान