
शिक्रापूर : कोरेगाव भीमा पेरणे फाटा येथील 1 जानेवारी या 206 व्या शौर्यदिनी कार्यक्रमासाठी सरकारकडून विशेष खबरदारी घेत हजारो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यात पोलीस मित्रांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
पोलिसांना सहकार्य, कार्यक्रमासाठी येणाऱ्या समाज बांधवाना बस मध्ये बसुन देणे, त्यांना आर्थिक मार्गदर्शन करुन सहकार्य करणे, योग्य ती काळजी घेणे, अश्या प्रकारची कामे पोलीस मित्र करतात. ह्यावर्षी शिक्रापूर पोलीस स्टेशन ला 150-200 पोलीस मित्रांच सहकार्य लाभले. पुणे नगर हायवे वरील जीत पार्किंग, चाकण चौक, शिक्रापूर चाकण रोड जाधवनगर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पेरणे फाटा, ह्या प्रत्येक ठिकाणी पोलीस मित्रांचा कडक बंदोबस्त होता. पोलीस मित्रांमुळे पोलिसांना चांगले सहकार्य लाभले आहे.
त्यांच्या विशेष सहकार्या मुळे शिक्रापूर परिसरातून व पोलीस प्रशासन कडुन पोलीस मित्रांचे सगळीकडून कौतुक होत आहे.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/7350559916