मोठी बातमी : मागासवर्गीय महिलेची फसवणूक करून जमिन लुबाडल्या प्रकरणी खेड मधील वकीलावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल….!

Spread the love

बातमी सर्वसामान्यांची पाण्यासाठी आमचा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा 8007686970/9766694886

खेड(राजगुरूनगर): मागासवर्गीय महिलेची फसवणूक करुन तिची जमीन लुबाडल्या प्रकरणी खेड मधील वकिलावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रंजना यशवंत गायकवाड (रा. पिंपरी बु!!) या मागासवर्गीय महिलेची फसवणूक करुन कुलमुखत्यार पत्र दिपक पवार याने स्वतःचे नावे नोंदवून मोठी फसवून केल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे ता. खेड जि. पुणे येथील वडीलोपार्जित जमीन गट नंबर ३३ चे कागदपत्र महिलेने काढले असता महिलेच्या लक्षात आले की, दिपक पवार याने वडगाव पाटोळे येथील जमीन गट.नं. ६७७ व ७७६ चे साठेखत व कुलमुखत्यार पत्र नोंदविताना त्या सोबत कुंटुंबाची दिशाभुल करुन काही एक माहीती न देता घाईगडबडीत वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या घेवुन घोर फसवणूक केली आहे. घाईगडबडीत घेतलेल्या सह्याचा वापर करुन वडगाव पाटोळे येथील महिलेची जमीन गट नंबर ३३ या जमीनीचे साठेखत व कुलमुखत्यार पत्र त्याचे स्वतःचे व महीला नामे माधुरी संतोष गिरी वय ३४ वर्षे (रा. औदर ता. खेड जि. पुणे) हीचे नावे नोंदविला असल्याचे निदर्शनास आले. त्या कागदपत्राच्या पडताळणी वरून दिपक पवार याने फसवणुक केली असल्याची खात्री झाली. त्यानंतर दिपक पवार यास वेळोवेळी फोन करून फसवणूक का केली याबाबत जाब विचारला असता त्यांने महिलेला उडवाउडवीची उत्तरे देवुन यापुढे मला फोन करून नका असे सांगितले. त्याच प्रमाने गावातील अनुसुचित जातीच्या अपंग असणा-या इंदुबाई भागाजी गायकवाड, रजनी सुरेश गायकवाड व त्यांचे भाऊ यांची देखील जमीनी बाबत फसवणुक केल्याचे तसेच सोनाली गौतम गायकवाड हिला कर्ज काढुन देतो असे सांगुन तीचे रोख रक्कम तसेच सोने घेवुन तीची देखील फसवणुक केल्याचे या महिलेला समजले. दिपक पवार यांचे घरी जावुन जमिनीचे फसवणुकीबाबत महिलेने विचारणा केली असता त्याने घराचे दार बंद करून खिडकीतुन जातीवाचक शिवीगाळ करून तुम्हाला काय करायचे ते करा,आमचे येथुन जा,आमचे येथे परत येवु नका असे म्हणुन जीवे मारण्याची धमकी दिली.या संदर्भात पिडीत महिलेने सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता रिपब्लिकन नेते हरेश देखणे,कामगार नेते अनिल मोरे,अँड अरुण सोनवणे, संदिप साळुंखे,निलेश ठाकुर, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी नाईक, अलका गुंजाळ, विकास शिंदे, सत्यवान शिंदे यांनी आक्रमक भुमिका घेत गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. अखेर पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील यांच्या आदेशाने खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents