
प्रतिनिधी संपादक लहू लांडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दीवाळीमध्ये आयोजित केलेल्या किल्ले व रांगोळी स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मनसेचे सरचिटणीस श्री गणेशआप्पा सातपुते,शिक्षक सेनेचे विद्यानंद मानकर सर,पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष सचिन चिखले,मनविसेचे राज्य सचिव आशिष साबळे जिल्हा अध्यक्ष समिर थिगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले..यात किल्ले स्पर्धा पहिला क्रमांक कु प्रज्वल सावंत याला सायकल बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले द्वितीय क्रमांक कू लतिकेत कुंभार याला मोबाईल तर तृतीय क्रमांक कु विवेक घेवडे याला क्रिकेट किट देऊन सन्मानित करण्यात आले..रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ छाया दुधाळे यांना फ्रिज द्वितीय क्रमांक केतकी सातकर यांना एलसीडी टीव्ही तर तृतीय क्रमांक सौ रुपाली बकरे यांना मिक्सर देऊन सन्मानित करण्यात आले..यावेळी जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ ढमढेरे,वैभव बाणखिले,सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज खराबी,जिल्हा संघटक अभय वाडेकर,चाकण शहर अध्यक्ष महेश शिरोळे,कोहिणकरवाडीचे उपसरपंच स्वप्नील कोहिणकर उपस्थित होतेकार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत,राजगुरुनगर शहर अध्यक्ष सोपान डुंबरे,तालुका उपाध्यक्ष सनी दौंडकर,आदित्य शिर्के,प्रफुल्ल ताये,सुजित थिगळे,बारकू पवळे,भरत बच्चे,वसीम पटेल यांनी केले होतेयावेळी खेड तालुका पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम गाडगे यांनी केले तर आभार कैलास दुधाळे यांनी मानले