

प्रतिनिधी-लहूजी लांडे
9766694886 /8007686970
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम 18 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी कडाचीवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ चाकण तालुका खेड येथे आयोजित करण्यात आला आहे या भव्य व दिव्य अशा अध्यात्मिक सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील हजारो भावीक भक्तांची गर्दी होणार असून त्या ठिकाणी सकाळपासून जगद्गुरु श्रींचा महा सत्संग सिद्ध पादुकांची मिरवणूक व आगमन गुरुपूजन, उपासक दिक्षा, दर्शन, प्रवचन, असाच पूर्ण दिवसाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच भावीक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान तर्फे विविध उपयोगी सेवा व उपक्रम राबविणे जातात त्यात प्रामुख्याने शैक्षणिक, वैद्यकीय, कृषी, आपातकालीन मदत, अंधश्रद्धा निर्मूलन, दुर्बल घटक मदत, अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात तरी सर्व खेड तालुक्यातील भाविक भक्तांनी अध्यात्म विज्ञान व व्यवहार या त्रिसूत्रीची सांगड घालणाऱ्या या अनमोल व जीवन बदलविणाऱ्या सुंदर भक्तीमय संगीतमय व दैदिप्यमान व मन हेलावून टाकणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्यास उपस्थित राहून संधीचे सोने करावे ही नम्र विनंती श्री गुरुदेव