



प्रतिनिधी संपादक लहू लांडे
त्यासाठी अध्यक्षा म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोळी मॅडम तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण संस्थेच्या खजिनदार श्रीमती कविताताई गोरे मॅडम उपस्थित होत्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील बालवर्ग विभाग व प्राथमिक विभाग द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक म्हणून प्रशस्तीपत्र व भेटवस्तू द्वितीय क्रमांक विद्यार्थ्यांना देण्यात आल्या महिला दिनानिमित्त मेहंदी स्पर्धेच्या विजयी महिला पालकांना बक्षीस देण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून तसेच 1.राजमाता जिजाऊ 2.सावित्रीबाई फुले 3. इंदिरा गांधी 4.झाशी की राणी या सर्वांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले जनता शिक्षण संस्थेचे श्रीमती कविताताई गोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व पालकांना मोलाचा संदेश दिला कार्यक्रमासाठी प्रशालेचे शिक्षक प्रतिनिधी श्री राजेंद्र जाधव सर तसेच सांस्कृतिक प्रमुख सौ. संगीता मंडलिक सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश पिंगळे सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार सौ संगीता मंडलिक यांनी मांडले अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला