
पोलीस स्टेशन चाकण, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे दिनांक 21/11/2015 रोजी 11:00 वाजेची पूर्वी जम्बुकर वस्ती जवळील दगडाची खान चाकण ता. खेड जि.पुणे येथे एक अनोळखी स्त्रीचे प्रेत वय अंदाजे 35 ते 40 वर्ष, उंची पाच फूट अंदाजे, तोंड व डोके कोणत्यातरी प्राण्याने खाल्लेले, केस गळालेले, कवठी दिसत आहे. चेहरा समजून येत नाही, दोन्ही हात कोणत्यातरी प्राण्यांनी खाल्लेले, गळ्यात पिवळ्या रंगाच्या धातूचे व काळया रंगाचे मनी असलेले मंगळसूत्र व पायात पांढऱ्या रंगाचे पैजन व बोटात जोडवे असलेले अशा वर्णनाची स्त्रीचे प्रेत पडलेली मिळून आले. त्यानुसार पोलीस स्टेशन चाकण येथे अकस्मात मयत 188/2015 दाखल असून त्यानुसार सदर मयत महिलेच्या नातेवाईकाचा शोध पोलिसांनी आजपर्यंत घेतला असून त्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. तरी कोणास सदर वर्णनाच्या मयत स्त्रीबद्दल / नातेवाईका बद्दल माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन चाकण येथे संपर्क साधावा.
संपर्क –
पोलीस स्टेशन चाकण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय.
पोलीस उपनिरीक्षक सी आर मोरखंडे-9921118100.