
प्रतिनिधी .. लहुजी लांडे
२०/४/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा. नियंत्रय कक्ष पिंपरी चिचवड कडुन प्राप्त कॉल अनुशंगाने माहीती मिळाली की, दिघी पोलीस ठाणे हददीत अंदाजे ३५ ते ४० वर्षाची अनोळखी महीला बेशुध्द अवस्थेत पडली असून सदर महीलेच्या डोकयास मार लागला आहे असे कळविले असता सदर घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलिस निरीक्षक, शैलेश गायकवाड, पोहवा/४७९ सानप, पोहवा/७५५ आढारी, पोहवा /१४५६ भोसुरे, पोशि/२२९६ जैनक, पोशि/२८७७ मेरगळ, पोशि/१२८१ कोळेकर, पोशि/२००१ नांगरे, पोशि/२८८३ काळे, पोशि/२३९९ बाळसराफ, पोशि१९४० हनमंते, पोशि/२२७३ दांगट असे तात्काळ रवाना होवून सदर घटनास्थळी भेट देवून पहाणी केली असता अनोळखी महीला हीचे डोक्यात कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालुन निघृण खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले सदर बाबत दिघी पोलीस ठाणे गु.र.नं.१९१/२०२४ भा.दं. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आमचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचे समांतर तपासकामी वरील नमुद स्टाफच्या दोन टिम करुन एक टिम सदर परीसरातील सीसीटीव्ही चेक करीत होती तर एक टिम सदर महीले सोबत शेवटी कोण होते या बाबत सदर परीसरात तसेच आळंदी घाट परीसर, झोपडपटटी परीसरात चौकशी करत होती. त्यावेळी पोहवा/४७९ सानप, पोशि/१२८१ कोळेकर, पोशि/२८७७ मेरगळ यांचे टिमला गोपनिय बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, एक संशयीत इसम हा वडगावरोड सुपरबाझार चे पाठीमागील बाजुस मोटर सायकल घेवून थांबला असून त्याचे अंगावर रक्ताने माखलेले कपडे आहेत अशी माहीती मिळाली असता सदर टिमने तात्काळ सदर ठिकाणी जावून संशयीत इसम ज्ञानेश्वर गजानन इंगाले वय ३१ वर्षे रा. खुटी पांगरी ता. मालेगाव जि. वाशिम सध्या रा. इंद्रायणी घाट आळंदी ता. खेड जि.पुणे यास मोटर सायकल सह ताब्यात घेवून त्याचे अंगावरील कपडयावरील रक्ताचे डाग या बाबत चौकशी केली असता त्याने सदर महीला हीचे सोबत प्रेम संबंध होते तो तिचेशी लग्न करणार होता परंतु ती इतर पुरुषा सोबत दिसून आल्याने रागाने चिडुन जावून रात्रीचे वेळेसे तिचे डोक्यात दगड घालुन खुन केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्याचे ताब्यातील मोटर सायकल बाबत चौकशी केली असता सदर मोटरसायकल ही शिक्रापुर पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) गु.र.नं.३५९/२०२४ भा.दं. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे माहीती मिळाली आहे. तरी सदर मोटर सायकल नंबर एमएच १२ पीजी ५०४६ व आरोपी ज्ञानेश्वर गजानन इंगाले वय ३१ वर्षे रा. खुटी पांगरी ता. मालेगाव जि. वाशिम सध्या रा. इंद्रायणी घाट आळंदी ता. खेड जि. पुणे यास पुढील कारवाईकामी दिघी पोलीस ठाणे येथे हजर केला आहे.अशाप्रकारे आरोपी बाबत काही एक सुगावा नसताना युनिट ३ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण समांतर तपास करुन व माहीती काढण्यासाठी पारंपारीक पध्दतीचा कौशल्यपूर्ण वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप, सीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, राहुल सुर्यवंशी, यांनी केली आहे.(संदिप डोईफोडे)पोलीस उपआयुक्त (गुन्हे) पिंपरी चिंचवड