


प्रतिनिधी लहू लांडे
आज दिनांक 25-04-2024 रोजी खेड तालुक्यात 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतीक हिवताप दिन सादर करण्यात आलेला आहे .
यावेळी हिवतापाची लक्षणे आणि उपाय योजना यांबाबत माहीती सांगण्यात आली.
हिवताप दिन माहीती फलक लावलेले आहेत .
रॅली काढण्यात आलेली आहे . हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत माहिती देण्यात आलेली आहे . आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात याव . डबकी , गटारे वाहती करणे . टायर , भंगार साहित्य साठवून ठेवू नये . रिकामे न करता येणारे पाणी साठयात गप्पी मासे सोडणे . किंवा जळके ऑईल टाकावे . दारे खिडक्या , व्हेट पाईपला जाळे बसवणे . मच्छरदानीचा वापर करावा . अंग भरूण कपडे वापरावी . परीसर स्वच्छ ठेवावा . घरातील फ्रीज , कुलर आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे .
वातावरणाचे तापमान वाढत असल्याने उष्माघात प्रतिबंध व जनजागरण करण्यात आले. यामधे दुपारच्या वेळी बाहेरील कामे टाळणे, भरपूर पाणी प्यावे चक्कर,मळमळ आदी लक्षणे दिसताच तात्काळ नजिकच्या आरोग्य केंद्रामध् संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले..
**सोबतच आज पासुन प्रौढ बी सी जी लसीकरण मोहिम सर्वे आशां मार्फत करण्यात येत आहे..
याबद्दल माहीती देण्यात आली ..
सर्व नागरिकांना हिवताप,उष्माघात यांपासुन स्वतःचा बचाव आणि उपचार यांबाबत जागृती करण्यात येत आहे
जि प पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ सचिन देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरील सर्व बाबींचे नियोजन करण्यात येत आहे