दिनांक 26 एप्रिल 2024, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी येथील आदर्श शिक्षिका सौ. विमल तिलकराज धिंग्रा मॅडम यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला.

Spread the love

प्रतिनिधी संपादक लहू लांडे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती खेड शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीरंग चिमटे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये सरपंच संदेश साळवे, केंद्रप्रमुख हिरामणदादा कुसाळकर,दत्तात्रय भालचिम ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश राघू नाणेकर,उपाध्यक्ष मंजस्वी सुमित नाणेकर, शिक्षक संघाचे मा. अध्यक्ष तानाजी महाळुंगकर ,मा मुख्याध्यापिका लक्ष्मीबाई दाते, मुख्याध्यापिका राजश्री बेदरकर, संदिप नाणेकर, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, व्यवस्थापन कमिटी सदस्य, धिंग्रा मॅडम यांचे सर्व कुटुंबीय, तालुक्यातील शिक्षक वर्ग,पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.**कार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोल ताशाच्या गजरात उत्सवमूर्ती धिंग्रा मॅडम आणि उपस्थित मान्यवरांचे आगमन झाले. दीप प्रज्वलन-सरस्वती मातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ईशस्तवन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची रंगत वाढवली.* *नाणेकरवाडी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंदाच्या वतीने धिंग्रा मॅडम यांना 11000 रुपये किमतीचे चांदीचे तबक सन्मानचिन्ह ,उभयतांना पूर्ण पोशाख शाल श्रीफळ बुके देऊन सन्मानित करण्यात आले.**धिंग्रा मॅडम यांच्या कार्याचा गौरव करत विस्ताराधिकारी श्रीरंग चिमटे तसेच केंद्रप्रमुख हिरामणदादा कुसाळकर यांनी शुभेच्छा दिल्या. उपस्थितांच्या वतीने संभाजी कोरडे, स्वाती आंधळे,अनिता सांगळे, Adv.सुवर्णा विठ्ठल नाणेकर, मॅडमच्या कन्या श्वेता उदय भावसार, सुनबाई प्रतीक्षा शमेश धिंग्रा,ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मणराव नाणेकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.**सत्कारला उत्तर देताना धिंग्रा मॅडम यांनी जीवनातील सुखदुःखांचा प्रवास करताना आलेल्या आठवणींना उजाळा दिला. “जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्वांना मी स्मरणात ठेवीन.” अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.**मॅडमचा तालुक्यातील विविध संघटना, सेवाभावी संस्था, नातेवाईक, मित्रपरिवार ग्रामस्थ पालक यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.**उपस्थित मान्यवरांचे आभार प्रवीण पाटील सर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय शिवले सर यांनी केले. स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर दोनच्या आदर्श शिक्षिका रांगोळीकार रूपाली परदेशी, संगीतशिक्षिका स्नेहल बेल्हेकर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडीतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत नाणेकरवाडी यांचे सहकार्य लाभले ,*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents