
चाकण : शिंदे वासुली गावचा कामगार तलाठी सतीश पवार हा लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात मोठी रक्कम घेताना रंगेहाथ अडकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या तलाठी महाशय यांचे अनेक कारनामे या अगोदरही परिसरात चर्चीले गेले होते. त्यात अनेक शेतकरी यांची मोठी आर्थिक पिळवनुक करत असल्याचे समोर आले होते. त्यात किरकोळ कामालाही या तलाठी महोदय यांच्याकडून आव्वाच्या सव्वा रकमांची मागणी केली जात असल्याचेही स्थानिक नागरिक सांगत आहेत.या अगोदर शिंदे-वासुली गावात ग्रामपंचायतच्या बाबतही मोठ्या आर्थिक तडजोडी होत असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. गावातील बांधकामाच्या नोंदी लावण्यासाठी आर्थिक तडजोडी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या अगोदरही ग्रामपंचायतच्या बाबत मोठी कारवाई होणार अशी चर्चा समोर आली होती पण कुठे तरी हात ओले होऊन कारवाईवर पडदा पडल्याची चर्चा रंगली होती.आजच्या कारवाईने अनेक महसूली अधिकारी यांचे धाबेदणानले आहेत. सध्या परिसरातील महसूली अधिकारी यांच्या बाबत सर्वसामान्य नागरिकांच्या बद्दल नाराजीचा सुरु आहे. त्यातच अशी मोठी कारवाई झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील जास्त खडीक्रशर असणाऱ्या गावचाही तलाठी हात ओले करत असल्याची चर्चा जोर धरू लागली असतानाच आजच्या कारवाईने अशा अधिकारी यांना मोठा धक्का दिला आहे.
प्रतिनिधी संपादक.