खेड-आळंदी विधासभेसाठी शिंदे शिवसेनेची नवी खेळी, थेट उमेदवाराला तयारीचे संकेत..

Spread the love

पुणे : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील सर्व घटक पक्ष उमेदवारीसाठी दावा दाखवू लागले आहेत. त्यातच महायुतीचे घटक असलेले शिंदे शिवसेनेकडून कोणत्याही परिस्थितीत ही विधानसभेची जागा लढवायचीच असा चंगच वरिष्ठ पातळीवरून बांधला आहे. त्यानुसार खेड-आळंदी विधनसभेत युवा चेहऱ्याला संधी देण्याच्या हालचालीना वेग आल्याचे पहावयास मिळत आहे.खेड-आळंदी विधानसभा निवडणूकिसाठी शिंदे शिवसेनेकडून प्रामुख्याने जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर आणि युवा चेहरा अक्षय जाधव यांचे नाव प्रामुख्याने विचारधीन आहे. त्यात अक्षय जाधव यांच्या नावाला खुद्द भगवान पोखरकर यांनीही मान्यता दिल्याने अक्षय जाधव यांनी जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खेड-आळंदी विधानसभेची निवडणूक ताकतीने लढवू आणि उमेदवार निवडूनही आणू असे बोलताना सांगितले.शिंदे शिवसेनेकडून दोन दिवसापूर्वीच वरिष्ठ पातळीवरून विधानसभा निहाय निरीक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ते विधानसभा निहाय सर्वे करून तो वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडे सुपूर्द करणार आहेत. त्यानुसार नवनियुक्त निरीक्षक यांनीही अंतस्त अक्षय जाधव या युवा चेहऱ्याला पसंती दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.महाविकास आघाडीमधील पक्षातील उमेदवारांची निवडणूक लढण्यासाठी झालेली भाऊगर्दी आणि त्यांच्यातील अंतर्गत सुप्त संघर्ष यामुळे कोण कुणाचे काम करेल की नाही? यावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महायुतीतील पक्षांतही काही अलबेल असल्याचे दिसत नाही. महायुतीतील पक्षही ऐनवेळी स्वबळावर लढण्यासाठी मागेपुढे बघणार नाही त्यामुळे महायुतीत जो तो वैयक्तिक पातळीवर तयारीला लागला आहे. त्यामुळे जागा कुणाला सुटते याचा विचार न करता थेट महायुतीतील घटक पक्षांनी परस्पर सर्व्हे करून आपल्या संभाव्य उमेदवार यांना कामाला लागण्याचे निर्देश दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.राजकीय : खेड-आळंदी विधानसभेत शिंदे शिवसेनेकडून युवा चेहऱ्याला उमेदवारी देण्याच्या हालचाली..!पुणे : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील सर्व घटक पक्ष उमेदवारीसाठी दावा दाखवू लागले आहेत. त्यातच महायुतीचे घटक असलेले शिंदे शिवसेनेकडून कोणत्याही परिस्थितीत ही विधानसभेची जागा लढवायचीच असा चंगच वरिष्ठ पातळीवरून बांधला आहे. त्यानुसार खेड-आळंदी विधनसभेत युवा चेहऱ्याला संधी देण्याच्या हालचालीना वेग आल्याचे पहावयास मिळत आहे.खेड-आळंदी विधानसभा निवडणूकिसाठी शिंदे शिवसेनेकडून प्रामुख्याने जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर आणि युवा चेहरा अक्षय जाधव यांचे नाव प्रामुख्याने विचारधीन आहे. त्यात अक्षय जाधव यांच्या नावाला खुद्द भगवान पोखरकर यांनीही मान्यता दिल्याने अक्षय जाधव यांनी जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खेड-आळंदी विधानसभेची निवडणूक ताकतीने लढवू आणि उमेदवार निवडूनही आणू असे बोलताना सांगितले.शिंदे शिवसेनेकडून दोन दिवसापूर्वीच वरिष्ठ पातळीवरून विधानसभा निहाय निरीक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ते विधानसभा निहाय सर्वे करून तो वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडे सुपूर्द करणार आहेत. त्यानुसार नवनियुक्त निरीक्षक यांनीही अंतस्त अक्षय जाधव या युवा चेहऱ्याला पसंती दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.महाविकास आघाडीमधील पक्षातील उमेदवारांची निवडणूक लढण्यासाठी झालेली भाऊगर्दी आणि त्यांच्यातील अंतर्गत सुप्त संघर्ष यामुळे कोण कुणाचे काम करेल की नाही? यावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महायुतीतील पक्षांतही काही अलबेल असल्याचे दिसत नाही. महायुतीतील पक्षही ऐनवेळी स्वबळावर लढण्यासाठी मागेपुढे बघणार नाही त्यामुळे महायुतीत जो तो वैयक्तिक पातळीवर तयारीला लागला आहे. त्यामुळे जागा कुणाला सुटते याचा विचार न करता थेट महायुतीतील घटक पक्षांनी परस्पर सर्व्हे करून आपल्या संभाव्य उमेदवार यांना कामाला लागण्याचे निर्देश दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

प्रतिनिधी संपादक…. लहू लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents