

युवासेना प्रभाग प्रमुख (प्रभाग क्र.२) स्वप्निल रोहिदास राक्षे यांनी राजगुरूनगरच्या विविध मागण्यांसाठी राजगुरूनगर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे.राक्षे यांनी प्रभाग क्रमांक २ मधील ओढा, नाला, संरक्षण भिंत दुरूस्तीबाबत व परिसर स्वच्छता, माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत प्रभाग २ मध्ये रंगरंगोटी करणेबाबत, एस.टी. स्टॅण्ड पासून आर्या स्ट्रिमपर्यंत पुर्व बाजूने झाडे लावून संवर्धन करणे व आर्या स्ट्रिमसमोरील विहीर पुनर्जिवित करणेबाबत आणि राक्षे इंग्लिश मिडियम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्या संदर्भात योग्य उपाययोजना करणे असे विविध विषय अनेक दिवस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहेत.याबाबत बोलताना राक्षे म्हणाले की, प्रभाग क्रमांक २ मध्ये असणारी संरक्षित भिंत ही पडलेली असून सदर भिंत ही दुरूस्त करून देण्यात यावी. या संरक्षित भिंतीबाबत प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांनी यापुर्वीही निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनाचा विचार करण्यात यावा. तसेच माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत प्रभाग २ मधील आनंदनगर, सांडभोर वस्ती, रोकडे वस्ती, पडाळवाडी या परिसरामध्ये जिथे रंगरंगोटीसाठी जागा उपलब्ध आहे, तिथे रंगरंगोटी करण्यात यावी रस्ता खचलेला आहे चांगला रस्ता व्हावा. एस.टी. स्टॅण्ड पासून आर्या स्ट्रिमपर्यंत पुर्व बाजूने झाडे लावण्यात यावीत व त्याचे संवर्धन करण्यात यावे, त्यामुळे तेथील परिसर सुशोभित होईल. आर्या स्ट्रिमसमोरील विहीरीचे पुनर्जिवित करावी, त्यामुळे तेथील नागरिकांची पर्यायी पाण्याची व्यवस्था होईल. ओढयाजवळ असलेले मोठ्या झाडाला चौथरा करण्यात यावा व येथील परिसर कंपाऊंड करून संरक्षित करण्यात यावा. या मागण्यांचा विचार न केल्यास स्थानिक रहिवासी व युवा सेना वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वप्निल राक्षे यांनी दिला आहे.
प्रतिनिधी.लहू लांडे