
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत दिपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल, पुणे विभागमध्ये ५० ते १०० कोटी ठेवी असलेल्या गट क्रमांक ३ मध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा दिपस्तंभ पुरस्कार २०२४ चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण यांना रामोजी फिल्मसिटी हैद्राबाद येथे फेडरेशन चे अध्यक्ष श्री.ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
यावेळी तेलंगणाचे मा.खासदार श्री.बी.बी.पाटील, कॉसमॉस को-ऑप बँकेचे अध्यक्ष श्री.मिलिंद काळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितिन गोरे,चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोक बिरदवडे,व्हा.चेअरमन प्राजक्ता गोरे, तसेच संचालक सुरेश कांडगे,सुनिल नायकवाडी,गिरीश गोरे,निलेश टिळेकर,बाळासाहेब साळुंके,गोरक्षनाथ कांडगे,राहुल परदेशी,साधना दिपक गोरे,नवनाथ शेवकरी,लक्ष्मण वाघ,तसेच तज्ञ संचालक प्रकाश भुजबळ,निलेश जाधव,सल्लागार अंकुश पवार, सुभाष गोरे, नितिन बोत्रे,योगेश गोरे,सागर गोरे, फेडरेशनचे वसुली अधिकारी गिरीष ताम्हाणे आणि संस्थेचे सचिव अनिल धाडगे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे