

प्रतिनिधी संपादक . लहुजी लांडे
न्यूज अपडेट
मा.श्री.शंकर भिकाजी दाते हे शिवसेना प्रणित शिव सहकार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष व युवासेनेचे जिल्हा चिटणीस होते. तसेच त्यांनी शिवसेनेत विविध पदावरती काम केले आहे. सहकार क्षेत्राचा त्यांना चांगला अनुभव असुन त्यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे.तसेच शेतकरी व इतर घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करणे तसेच शासकीय कार्यालयात जाऊन सर्वसामान्य लोकांच्या कामांचा पाठपुरावा करणे अशा प्रकारची अनेक कामे करून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी या आधी सोसायटी संचालक म्हणून उत्तम काम केले आहे.त्यांची चेअरमन पदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी नवनियुक्त चेअरमन श्री.शंकर भिकाजी दाते यांनी प्रतिनिधीशी बातचीत करताना सांगितले.कि सर्व सोसायटी संचालकांना विश्वासात घेऊन काम करणार असून सोसायटी मधील सर्व भाग धारक शेतकरी सभासद यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.या निवड प्रक्रियेच्या वेळी कहु, कोयाळी, दरकवाडी या तिन्ही गावातील ग्रामस्थ व सोसायटी संचालक तसेच कहू-कोयाळी व दरकवाडी या दोन्ही ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.श्रीमती एस एम बगाटे मॕडम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहीले