
न्यूज अपडेट
फुललेल्या शक्तीच्या ऐल तीरावर आणि भक्तीच्या पैलतीरावर पहुडलेल्या महाराष्ट्राला मानवतेच्या दिव्य प्रकाशाने तेजोमय करण्याचे काम एका तेजस्वी ज्ञान सुर्यान केले, आणि त्याच संतांच्या मायभूमी मध्ये आदर्श गाव गोसासी गावचे सुपुत्र श्री नवनाथ भिकाजी गोरडे यांचा जन्म सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात झाला आपल्या मायभूमी मध्ये शिक्षण घेत असताना मनामध्ये नेहेमी इच्छा होती की मिलिटरी मध्ये भरती होऊन भारत मातेची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी आटोकाट प्रयल केला व ते सैनिकांमध्ये भरती झाले, भरती झाले नंतर त्यांनी उत्कृष्टरित्या लाखमोलाची कामगिरी केली, आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी नावलौकिता मिळविली उत्कृष्टरिती उल्लेखनिय कामगिरी करून सेवानिवृत्त झाले आदर्श गाव गोसासी गावचे ग्रामस्थांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली व सत्कार करण्यात आला, त्यांनी आपल्या आई वडिलांचा अमृतुल्ये अभिष्टचिंतन सोहळा १७/८/२०२४पाबळ तालुका शिरुर जिल्हा पुणे येथे शांताई लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा केला, त्यावेळी अनेक मित्र परिवार व सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाय चेअरमन पोलिस पाटील गोसासी गावचे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते .
प्रतिनिधी अर्चना हजारे