जाणीव फाऊंडेशनचा लोकनेते बाळासाहेब थोरात आदर्श शिक्षक पुरस्कार खेड तालुक्यातील सुमंत विद्यालय पिंपरी बुद्रुकचे अरविंद गवळे सर यांना जाहिर

Spread the love

प्रतिनिधी दत्ता भगत

न्यूज अपडेट

पिंपरी बु. दि.२४शिक्षक दिनाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील पठार भागातील विविध युवकांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात . यात प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण , वृक्ष संवर्धन आणि सामाजिक कार्य. यावर्षी जाणीव फाउंडेशनच्या वतीने समाजसेवक व आदर्श शिक्षक यांचा गौरव शिक्षक दिनाचे औचित्य साधून केला जातो . यावर्षी रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी अकरा वाजता महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते सह्याद्री महाविद्यालय के . बी . देशमुख सभागृह संगमनेर येथे गुणवंत शिक्षकांसह निर्भय बनो अभियानाचे प्रमुख एडवोकेट असीम सरोदे यांनाही गौरवण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे समन्वयक अंतोनजी मिसाळ व अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे यांनी दिली . यावर्षीचा आदर्श शिक्षक श्री लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024 हा खेड तालुक्यातील श्री सुमंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी बुद्रुक चे शिक्षक श्री अरविंद गवळे सर यांना जाहीर झाल्याचे पत्र जाणीव फाउंडेशन संगमनेर यांच्याकडून प्राप्त झाले . श्री अरविंद गवळे सर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद खेड तालुका कार्यवाह म्हणून शिक्षकाचे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात . तसेच खेड तालुका मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात सहभागी होत असतात शिक्षकांच्या खेड तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदी ते कार्यरत आहेत .विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणे शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून कार्य केलेले आहे .मुलांना दहावी व बारावी नंतर करिअरचे मार्गदर्शन ,शाळेतील विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व व पर्यावरणाचे रक्षण या विषयावर सदोदित मार्गदर्शन करत असतात .खेड तालुक्यातील मराठी व हिंदी या विषयांच्या भाषा समितीवर काम करतात . जाणीव फाउंडेशनने यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार अरविंद गवळे यांना जाहीर केलेला आहे .जाणीव फाउंडेशन ही संस्था अतिशय उल्लेखनीय कार्य करत असते समाजातील देश घडवणाऱ्या शिक्षकांचा व समाजाचे प्रबोधन करणाऱ्या समाजसेवकांचा पर्यावरणासंदर्भात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा , कवींचा सन्मान करून आदर्श समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून जाणीव फाउंडेशन कार्य करत असते . संस्थेचे समन्वयक अंतोनजी मिसाळ व अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे व त्यांचे सर्व सहकारी अतिशय उत्साहाने जाणीव फाउंडेशन कार्य दिवसेंदिवस कसे चांगले होईल याकडे लक्ष देत असतात .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents