रासे येथे झालेल्या अनोळखी इसमाचे खुनाच्या गुन्हयाची उकल, गुन्हयातील कटाचा सुत्रधार व मुख्य आरोपी चाकणपोलीसांकडून अटक

Spread the love

प्रतिनिधी.लहू लांडे

दिनांक १९/०९/२०२४ रोजी चाकण पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाली की, रासे गावचे हददीत मुंगसे वस्ती ओढ्याचे जवळ वाडेकर यांचे शेताचे बांधांवरील झुडपांमध्ये एक पुरुष जातीचे अनोळखी इसमाचे प्रेत पडलेले आहे, सदर माहिती वरुन चाकण पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी अंगलदार यांनी सदर घटनास्थळी तात्काळ धाव घेवुन पहाणी केली असता एक पुरुष जातीचे मयताचे प्रेत त्याचे चेह-यावर मारहाण करुन जखमा करुन त्याचा चेहरा छिन्नविच्छींन्न केलेल्या अवस्थेत दिसला. सदर इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने खुन करुन त्याचे प्रेत झुडपांमध्ये लपवले असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ घटनेची माहिती डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग यांना देवुन वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन चाकण पोलीसांना गुन्हयातील मयताची ओळख पटवुन आरोपी निष्पन्न करुन ताब्यात घेण्या बाबत सुचना व मार्गदर्शन केले.चाकण पोलीसांनी अनोळखी मयता बाबत माहिती प्राप्त केली असता मयत हा रासे गावातील संदिप शिवाजी खंडे, वय ४० वर्षे, रा. ठाकरवाडी रासे ता. खेड जि. पुणे असे असल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ तपासाचे चक्रे फिरवुन मयताचे सोबत दिनांक १८/०९/२०२४ रोजी दिवसभर व रात्री कोण सोबत होते, त्याचे कोणाशी वाद होते काय, याबाबत माहिती घेतली असता गोपनीय बातमीदार यांचेकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, संशयीत सुरेश मेंगाळ याने सदर खुन केलेला आहे. तात्काळ सुरेश मेंगाळ यास डि. बी. पथकाने ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली, परंतु त्याचे बोलण्यामध्ये वारंवार विसंगती येत असल्याने त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने सांगीतले की, “मागील सहा महिण्यापासुन माझा दुरचा मामा संदिप शिवाजी खंडे हा छोटया मोठ्या कारणावरून मला लोकांसमोर वाकडे तिकडे बोलुन मारहाण शिवीगीळ करत होता, त्यामुळे मी सहा महिण्यापासुन त्याचा एकांत बघुन कायमचा संपविण्याचा विचार करत होतो, काल रोजी अगोदरच दारु पिला असल्याने त्याला मी गोड बोलुन रासे गावचे हददीत मुंगसे वस्ती ओढयाचे जवळ वाडेकर यांचे शेतात निर्जन स्थळी नेवुन पुन्हा त्यास दारु पाजुन झोपवले, त्यानंतर पुन्हा गावात देशी दारु आणण्यासाठी गेलो तेव्हा तेथे मला माझा जवळचा मित्र दिलीप ऊर्फ टपाल अघान हा भेटला तेव्हा मी त्यास तु मला संदिप खंडे यास मारण्यासाठी मदत कर असे सांगीतल्याने तो तयार झाला. लगेच मी व टपाल दारु घेवुन त्याला झोपवलेल्या ठिकाणी आलो. टपाल याने जवळ असलेल्या लाकडी दांडक्याने संदिप ऊर्फ बाळशीराम याचे तोंडावर लागडी दांडक्याने जोर जोरात मारहाण केली त्यानंतर मी हाताने त्याचा जिव जाई पर्यंत गळा आवळाला आहे त्याची पुर्ण हालचाल थांबल्यानंतर त्याला बाजुचे झुडपात ढकलुन दिले.” आरोपी नामे सुरेश ज्ञानेश्वर मेंगाळ वय ३७ वर्षे, रा. ठाकरवस्ती रासे, ता. खेड जि. पुणे याने चाकण पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचेकडे सदर खुन केल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्हयाचे पुढील तपासकामी ताब्यात घेतले आहे. तसेच युनिट ३ गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांचे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड व त्यांचे पथकाने यातील दुसरा आरोपी नामे दिलीप ऊर्फ टपाल पांडुरंग अधान यास ताब्यात घेतले आहे.सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री. शशिंकात महावरकर, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड व पथक, पौनि गुन्हे श्री. नाथा घार्गे, डी बी पथकाचे सपोनि प्रसंन्न ज-हाड, कुंदा गावडे, गणपत धायगुडे, पोसई अभिजीत चौगुले, संदिप बोरकर, सचिन मोरखंडे, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे, मैरोबा यादव, सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, सुदर्शन बर्डे, सुनिल भागवत, महेश कोळी, उध्दव गर्जे, महादेव बिक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, नितीन गुंजाळ, मंगेश फापाळे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents