
प्रतिनिधी .लहू लांडे
“धुळे येथुन गांजा तस्करी करुन उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी आय.टी. पार्क व शैक्षणिक संस्थाचे परिसरामध्ये गांजा विक्री करणारे ०३ इसम ३३ किलो गांजासह अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात”
मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.
मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २, बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले. सपोनि विक्रम गायकवाड व पथक हे हिजवडी म्हाळुंगे परीसरात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार निखिल शेटे व मयुर वाडकर यांना तीन इसम हे संशयितरित्या जात असताना मिळून आले. सदर तीन इसम नागे १) सुरेंद्रकुमार संतोष त्रिपाठी, वय ३६ वर्षे, रा मौजे म्हाळुंगे येथे भाडयाने म्हाळुंगे पुणे मुळ रा चित्रकुट, तहसिल श्रीरामपुर, जिला चित्रकुट घाम करवी, राज्य उत्तरप्रदेश २) अशोक गुलाबचंद पावरा, वय १९ वर्षे, रा मांजणी पाडा, फतेपुर फॉरेस्ट, ता शिरपुर जि धुळे ३) पवन सानु पावरा, वय १९ वर्षे, रा सदर यांचे ताब्यातुन ९,५०,२००/- रुपये किंमतीचा माल ज्यामध्ये १६ किलो १०४ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, ०२ मोबाईल व ०१ दुचाकी गाडी जप्त करुन त्यांचेविरुध्द हिंजवडी पोलीस स्टेशन गु.र.क्र. १०७४/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे तपासामध्ये आरोपीतांकडे सखोल चौकशी करुन त्यांचेकडुन आणखी ८,५०,४५०/- किंमतीचा १७ किलो ००९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपीच हे हिंजवडी येथील आय.टी. पार्क व शैक्षणिक संस्थांचे परिसरामध्ये विक्री करत असल्याचे निष्पन्न होत आहे. सदर गुन्हयाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक कडील सपोनि सचिन कदम हे करीत असून आरोपीत हे दि २४/०९/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहेत,
आरोपी नामे १) सुरेंद्रकुमार संतोष त्रिपाठी, वय ३६ वर्षे, रा मौजे म्हाळुंगे येथे भाडयाने म्हाळुंगे पुणे मुळ रा चित्रकुट, तहसिल श्रीरामपुर, जिला चित्रकुट धाम करवी, राज्य उत्तरप्रदेश २) अशोक गुलाबचंद पावरा, वय १९ वर्षे, रा मांजणी पाडा, फतेपुर फॉरेस्ट, ता शिरपुर जि धुळे ३) पवन सानु पावरा, वय १९ वर्षे, रा सदर यांचेकडुन एकुण लाख ६५० रूपये किंमतीचा ३३ किलो ११३ ग्रॅम गांजा, ०२ मोबाईल व ०१ दुचाकी गाडी जप्त करण्यात आला असुन आरोपींकडे पुढील अधिक तपास चालु आहे.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड पोउपनि ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार मयुर वाडकर, निखिल शेटे, प्रदिप शेलार, किशोर परदेशी, शिल्पा कांबळे, निखिल वर्षे, राजेंद्र बांबळे, गणेश कर्पे, सदानंद रुद्राक्षे, रणधीर माने, कपिलेश इगवे, गोविंद डोके, पांडुरंग फुंदे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी यांचे पथकाने केली आहे.
(संदिप डोईफोडे) पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड