
प्रतिनिधी .लहू लांडे

खेड तालुक्यातील शिरोली येथील
कालकथित रवींद्र मारुती देखणे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त दि. १९ गुरुवार रोजी आदर्श विद्यालय ,शिरोली ता.खेड जि. पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपणनाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला मा. जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख,उद्योजक मा. मनोज सावंत, विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर दौंडकर यांची प्रमुख उपस्थित होती.
मा. जिल्हा परिषद सदस्य मा.अतुलभाऊ देशमुख यांच्या हस्ते इयत्ता आठवी ,नववी, दहावीच्या जवळपास १२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे पर्यावरण विभाग महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.रज्जाकभाई शेख,कामगार आघाडी महा. कार्याध्यक्ष मा.अनिलभाऊ मोरे,रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे महा. महासचिव मा.संदीप भाऊ साळुंके,
शिरोली गावचे मा.सरपंच मा.चंद्रकांत सावंत, आदर्श विद्यालयाचे उपाध्यक्ष तथा उद्योजक मा.जगननाना सावंत, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संघटक मा.तुषार जगताप, रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.संकेत जगताप,रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.तुषार गायकवाड, मा.उपसरपंच संतोष खरपासे,संजय एकनाथ सावंत,मनसे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष मोहिनीताई राक्षे, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 संपादक मनोहर गोरगल्ले,राजेजी गुजर प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष हेमंत विरकर,RPI निकाळजे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.आकाशभाऊ डोळस, योद्धा मा. सैनिक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव जाधव,उद्योजक मा.काळुराम दजगुडे, मा.संदीप पवळे, मा.महादू सावंत ,मा.गोरक्ष पवळे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट नेते संदीपआप्पा दजगुडे ,रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख विकास शिंदे, भाजपा विद्यार्थी खेड तालुका अध्यक्ष रवी भाऊ वाडेकर, चास गावचे तंटामुक्ती अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मा.राहुल सावंत , वजरा लोखंडे,समीर पाटील, हरीश कांबळे, महेंद्र बनसोडे,देखणे परिवारातून कल्पेश देखणे,सचिन दिगंबर देखणे,निरंजन देखणे , हरेशभाई देखणे यांच्या पत्नी शिरोली गावच्या पोलीस पाटील निर्मलाताई देखणे , मुले कबीर , निर्मिका आणि शिरोली गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी अभिवादन पर विचार मांडले. मा .जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊं अभिवादन पर बोलताना हरेशभाई देखणे आणि कुटुंबीयांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे स्पष्ट मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता भगत यांनी केले आभार प्रदर्शन सोमनाथ सावंत यांनी केले.