

प्रतिनिधी.लहू लांडे
पोषण अभियान या उपक्रमाची अंमलबजावणी करीत असताना दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना खेड (राजगुरुनगर), आणि स्माईल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये साजऱ्या होणाऱ्या पोषण माह चे औचित्य साधून अंगणवाडी केंद्र शिरोली येथे प्रभात फेरी, अन्नप्राशन, तसेच गरोदर स्त्रियांचे ओटी भरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यवेक्षिका सी अनिता गोपाळे यांनी पोषण आहाराचे महत्त्व आणि तीन वर्षापर्यंत बाळाच्या वाढीची देखरेख याविषयी मार्गदर्शन केले. श्री प्रसाद वाडेकर यांनी मार्स विग्ली कंपनी द्वारे केल्या जाणाऱ्या अर्थसाहाय्यातुन अंगणवाडी केंद्रातील भौतिक सुविधाव ला भार्थ्यांकरिता स्माईल फाउंडेशन मार्फत उपलब्ध करून दिल्या जाणान्या सेवाबद्दलची माहिती दिली. श्री विठ्ठल बुरुड यांनी अनेमिया प्रतिबंध आणि पूरक आहार या संबंधी माहिती दिली. अशा वर्कर पूनम पवळे यांनी प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्च्यात घ्यावावची काळजी याबद्दल गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन केले अंगणवाडी सेविका अनिता पारगे शकुंतला उभे, शारदा सावंत, मदतनीस कृष्णबाई कड, सुवर्ण पवळे, राणी पारगे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थांनी अंगणवाडी सेवाबद्दल आपले अभिप्रायनोंदविले. सहीपोषण देशरोशन, पोषण भी पढ़ाई भी, एक पेडमा के नाम या उद्दिष्टांवर माहिती देऊन अनिता पारगे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.